शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नेत्यांनी डावलले, जनतेने स्वीकारले

By admin | Updated: November 3, 2015 00:34 IST

अपक्ष निलोफर आजरेकर विजयी : सर्व पक्षांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

कोल्हापूर : उमेदवारी देताना प्रतिष्ठा करून नेत्यांनी डावलले; पण जनतेने स्वीकारले म्हणण्याची वेळ कॉमर्स कॉलेज, प्रभाग क्र. २६च्या निकालावरून दिसते. येथे सर्व पक्षांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल लागला. सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे ताकद लावूनही या प्रभागातून मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या स्नुषा निलोफर अशकीन आजरेकर यांनीे विजयाचा झेंडा उभारला. हिंदू -मुस्लिम सलोखा कार्यक्रमाचा त्यांना फायदा झाला. कॉमर्स कॉलेज प्रभागात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी एकापेक्षा एक सरस उमेदवार उभे केले होते. यामध्ये निलोफर आजरेकर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असतानाही माजी आमदार पी. एन. पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आजरेकर यांना उमेदवारी देण्यास प्रखर विरोध केला होता. पाटील यांनी गायत्री अमर माने यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास भाग पाडले; पण माने यांना अवघा १४६ मतांचा आकडा गाठता आला; त्यामुळे नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसची उमेदवारी डावलल्याने आजरेकर निलोफर यांच्यासमोर ताराराणी-भाजपचा पर्याय होता; पण भागातील जनतेशी चर्चा केल्यानंतर महायुतीची उमेदवारी आजरेकर यांनी नाकारली. तोपर्यंत राष्ट्रवादीची उमेदवारी भाग्यरेखा पाटील यांना जाहीर झाली होती; तर शिवसेनेचीही उमेदवारी पूजा भोर यांना दिली होती. त्यामुळे मतदारांच्या मतानुसार आजरेकर यांंना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा निर्णय सासरे गणी आजरेकर यांनी घेतला. विशेष म्हणजे, ज्या उमेदवारीसाठी पी. एन. पाटील यांनी प्रतिष्ठा केली, त्या गायत्री माने यांना फक्त १४५ मतांवर समाधान मानावे लागले; तर मतमोजणीत आजरेकर यांची चुरस ‘ताराराणी’च्या गुलजारबी बागवान यांच्याशी झाली. पहिल्या दोन फेऱ्यांत बागवान यांनी आघाडी घेतली; तर आजरेकर या १४८ मतांनी पिछाडीवर होत्या; पण तिसऱ्या फेरीत आजरेकर यांना ३१५ मते मिळाल्याने त्यांची पिछाडी १९ मतांवर आली; पण अखेरच्या चौथ्या फेरीतही आजरेकर यांना २५७ मते मिळाली; तर बागवान यांना अवघ्या १९६ मतांवर रोखण्यात यश मिळवले. ( प्रतिनिधी )