शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

दवाखाने, औषध दुकानांची एलबीटीसाठी तपासणी मोहीम

By admin | Updated: December 19, 2014 23:27 IST

महापालिका : स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : शहरातील मोठे हॉस्पिटल्स, दवाखाने तसेच किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांकडून एलबीटी (स्थानिक संस्था कर) अपेक्षित इतका भरला जात नाही. त्यामुळे महापालिकेला वर्षाला तब्बल २२ कोटींहून अधिकचा फटका बसतो. या ठिकाणच्या एलबीटी वसुलीसाठी महापालिके तर्फे विशेष पथके करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.औषधे व हॉस्पिटल्ससाठी एलबीटी आकारणीची तरतूद आहे का? असल्यास याची वसुलीची काय स्थिती आहे, असा सवाल आजच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. औषधांवर दोन तर वैद्यकीय उपकरणांवर चार टक्के एलबीटी आकारणी केली जाते. सध्या यातून मनपाला दोन कोटी २५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते, असे प्रशासनाने सांगितले. शहरातील औषधे व हॉस्पिटल्सची उलाढाल पाहता मिळणारे एलबीटीतून मिळणारे उत्पन्न अगदी नगण्य आहे. प्रशासनाने या विभागातील वसुलीसाठी मोहीम उघडण्याची मागणी सदस्यांनी केली.मोठे हॉस्पिटल्स व दवाखान्यांतील उपकरणांची चौकशी करणे,औषध विके्रत्यांची वार्षिक उलाढाल तपासण्यासाठी बँक खाती, बॅलेन्सशिट, टर्नओव्हर आदींची माहिती घेण्यासाठी विशेष पथके नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे औषध विक्रेत्यांकडून किमान २० ते २५ कोटी रुपयांचा एलबीटी जमा होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.गांधीनगर-तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची खूपच ढिलाईची भूमिका आहे. व्यापाऱ्यांना अधिकारी झुकते माप देत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तावडे हॉटेलप्रकरणी आता १४ जानेवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. तत्पूर्वी या परिसरात व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग केल्याचे छायाचित्रे व इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एलईडी प्रकल्पासाठी चार ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या टप्प्या प्रायोगिक तत्त्वावर ५०० ठिकाणी बल्ब बसविण्यात येणार आहेत. ३० डिसेंबरला निविदेची अंतिम मुदत असल्याची माहिती एका प्रश्नावर अधिकाऱ्यांनी दिली.(प्रतिनिधी)