भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रशाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते झाले. शाळेमध्ये बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यात भडगाव केंद्रशाळेने तालुक्यात प्रथम मान मिळविला आहे.
मुख्याध्यापक सुभाष निकम यांनी शाळेच्या प्रगतीचा व शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. आमदार पाटील यांनी शाळेच्या स्टेज दुरुस्तीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शाळेच्या रिकाम्या जागेत प्रशस्त क्रीडांगण उभारण्यात यावे, अशी मागणीही शाळा व्यवस्थापन समितीने आमदारांकडे निवेदनातून केली.
यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, पं. स. सदस्या श्रीया कोणकेरी, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, सरपंच बसवराज हिरेमठ, उपसरपंच राजू चौगुले, उदय पुजारी, बाळासाहेब मोर्ती, ग्रामविस्तार अधिकारी घेवडे, आण्णासाहेब पाटील, सुनील पाटील, आनंदा पिसे, विश्वनाथ कोरी, अश्विनी कुरळे, मंगळ होळीकुप्पी आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
आण्णासाहेब गजबर यांनी प्रास्ताविक केले. संदीप नाईक यांनी स्वागत केले. अमर डोमणे यांनी आभार मानले.
------------------------
* फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रशाळेत आमदार राजेश पाटील यांनी फीत कापून बायोमेट्रिक प्रणालीचे उद्घाटन केले. शेजारी बसवराज हिरेमठ, राजू चौगुले, अजित बंदी, सुभाष निकम, श्रीया कोणकेरी आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३००३२०२९-०१