शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जवान विजय कराडे यांना अखेरचा निरोप, पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना अपघात झाले होते गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:30 IST

केवळ आठ महिनेच राहिला होता सेवा कालावधी

दिंडनेर्ली : ‘अमर रहे अमर रहे, विजय कराडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये नागाव (ता. करवीर) येथील जवान विजय विलास कराडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.पंजाबमधील चंदी मंदिर येथील रेजिमेंट येथे शनिवारी कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन कराडे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला होता. पुण्याहून मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव घरी आणताच आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा आणि नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.गावातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूने रांगोळी काढून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित सर्वांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून पुष्पवृष्टी केली. विजय ज्या शाळेत शिकले, ज्या मैदानावर भरतीचा सराव केला त्याच मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ अजयने पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी लष्कराच्या 109 मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. अंत्ययात्रेत आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक मुदस्सर शेख, सरपंच सतपाल मगदूम, माजी सरपंच दीपाली विजय नाईक, रंगराव तोरस्कर, सुभेदार डाफळे, करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक व विद्यार्थी, पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक उपस्थित होते. ग्रामपंचायत, तरुण मंडळे यांनी अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नेटके नियोजन केले होते.केवळ आठ महिनेच राहिला होता सेवा कालावधीविजय हे अग्निवीरमधून भरती झाले होते. आठ महिन्यांनंतर त्यांचा सेवा कालावधी संपणार होता. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.