शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ कोरोना केअर सेंटरमध्ये जेवणात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:20 IST

शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागातील कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शुक्रवारी दुपारी अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णांनी आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबर वादावादी केली. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. सुमारे दोन तास यावरून गोंधळ सुरू होता.

ठळक मुद्देरुग्ण, कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी, सुमारे दोन तास गदारोळनिकृष्ट जेवण मिळत असल्याचा अलगीकरण कक्षातील नागरिकांचा आरोप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागातील कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शुक्रवारी दुपारी अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णांनी आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबर वादावादी केली. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. सुमारे दोन तास यावरून गोंधळ सुरू होता.शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग यांच्या वतीने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागांमध्ये हे ३५० बेडचे सेंटर आहे. यामध्ये सध्या १७० रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिकेचे डॉक्टर उपचार करीत आहेत. जेवणाची सोयही महापालिकाच करीत आहे.शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास जेवण वाटप केल्यानंतर एका रुग्णाच्या जेवणात भातामध्ये अळ्या आढळून आल्या. त्याने ते संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर इतर रुग्णही संतप्त झाले. याचबरोबर अलगीकरण कक्षातील नागरिकही निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्यावरून जमा झाले.

या सर्वांनी मिळून आरोग्यसेवकास जाब विचारला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार झाला. सुमारे दोन तास गदारोळ सुरू होता.

जेवणात अळ्या असल्याची एका रुग्णाची तक्रार आली आहे. उर्वरित लोकांनी जेवण चांगले होते असे सांगितले आहे. तरीही ही अन्न व औषध प्रशासनाकडून जेवणाची तपासणी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती नोडल ऑफिसर यांनी दिली आहेसुविधांचा अभावअलगीकरण कक्ष अथवा कोरोना केअर सेंटरमधील लोकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. बाथरूमच्या कड्या खराब झाल्या आहेत. महिलांना त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. जेवणही ही निकृष्ट दर्जाचे मिळते. डासांचा प्रादुर्भाव आहे. अशा तक्रारी येथील नागरिक करत आहेत.अलगीकरण कक्ष कोरोना सेंटर वादाच्या भोवऱ्यातअलगीकरण कक्षात सुविधा नसल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी एका मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. शुक्रवारी खराब जेवण मिळत असल्याचे समोर आहे. एकूणच कोरोना सेंटर वादाच्या भोवऱ्यात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ