शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा उतरा, भरपाई मिळवा

By admin | Updated: January 5, 2015 00:43 IST

शासन उचलणार वाटा : हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास दिलासा; कृषी खात्याशी संपर्काचे आवाहन

भीमगोंडा पाटील -कोल्हापूर -शासनाच्या कृषी विभागाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे. काजू, आंबा, केळी, द्राक्ष उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार आहे. शासनाने विमा हप्त्याचा मोठा वाटा उचलला आहे. नुकसान भरपाई खासगी कंपन्या देणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊन १५ जानेवारीपर्यंत विमा उतरविणे आवश्यक आहे.सन २०१३ वर्षापासून ही योजना राबविली जात आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने नवीन आदेश काढून गारपिटीने यंदा नुकसान होणाऱ्या पीक नुकसानीलाही भरपाई द्यावी, अशी सूचना दिली आहे. यामुळे आता हवामान बदलाने व गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए. आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. काजू, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळझाडांचा विम्यासाठी समावेश आहे. एक हेक्टर आंबा, केळीसाठी ११ हजार रुपयांचा विमा हप्ता आहे. यांपैकी दोन हजार रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. या बदल्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीस ३३ हजार ३३३ रुपये मिळणार आहे. काजूसाठी ८ हजार २५० रुपयांचा विमा हप्ता आहे. यातील १५०० रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहेत. भरपाई २५ हजार मिळणार आहे. द्राक्षांसाठी १६ हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता आहे. शेतकऱ्यास तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. भरपाईपोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीस विमा हप्ता वरीलप्रमाणेच आहे. मात्र, भरपाई रक्कम विविध टप्प्यांत वेगवेगळी आहे. १६ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरअखेरसाठी भरपाई हेक्टरी २ ते २० हजारापर्यंत मिळणार आहे. ८ ते ३० नोव्हेंबरअखेर झालेल्या नुकसान भरपाईपोटी ५ ते ९० हजार, तर १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ अखेर ५ ते ४० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. सर्व टप्प्यांची अधिकाधिक दीड लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे.वाहन विमा कंपन्या पिकांसाठीही... वाहन अपघातानंतर नुकसानभरपाई देणाऱ्या टाटा ए.आय., जी. इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. अ‍ॅर्गो, रिलायन्स इन्शुरन्स, आदी कंपन्यांवर आता पीक नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. हवामान आधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी. कृषी विभागातर्फेही जागृती केली जात आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक