कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे देवस्थानच्या जमिनीची अधिकृत माहिती नाही. समितीचे लेखापरीक्षण अजून सुरू आहे आणि तरीही समितीच्या व्यवहाराची करा सीबीआय चौकशी असे प्रत्युत्तर समितीच्या सचिव शुभांगी साठे व सहायक सचिव एस़ एस़ साळवी यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी समितीच्या सदस्या संगीता खाडे, सदस्य बी़ एऩ पाटील-मुगळीकर, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते़ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने सोमवारी (दि़ १२) देवस्थान समितीने जमीन आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप पुराव्यानिशी केला होता़ या पार्श्वभूमीवर खुलासा करण्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने बलभीम बँक येथील देवस्थान समितीच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. पण लेखा परीक्षण, जमिनीची नोंद याबाबतची कोणतीही अद्ययावत नोंद समितीकडे उपलब्ध नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले़ लेखा परीक्षणाबाबत खुलासा करताना साळवी म्हणाले, देवस्थान समितीचे १९६९ ते १९८९ या कालावधीचे लेखा परीक्षण बी़ एस़ शेवाळे अँड असोसिएटस यांनी एप्रिल १९९० ते जून १९९१ या १५ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केलेले आहे़ तसेच १९८९ ते २००७ पर्यंतचे लेखा परीक्षणही शेवाळे यांनी केलेले आहे़ पण शेवाळेंच्या निधनानंतर देवस्थान समितीने दुसऱ्या लेखापरीक्षकांची नियुक्ती केलेली नव्हती़ सध्या विधी व न्याय विभाग यांच्यातर्फे कोचर अॅण्ड असोसिएटस, मुंबई यांच्याकडून २००७ ते २०१२ पर्यंतचे लेखापरीक्षण सुरू आहे़ दागिन्यांचे मूल्यांकनही अद्ययावत आहे़ (प्रतिनिधी)लेखी पुराव्याचा अभाव देवस्थान समिती ज्या विधी व न्याय विभागाच्या आखत्यारित येते, त्या विभागानेच लेखापरीक्षण आणि जमिनीच्या तपशीलाबाबत दिलेली माहिती अन् देवस्थान समिती यांच्याकडील माहिती यामध्ये प्रचंड तफ ावत असल्याचे आढळून आले़ या तफ ावतीबाबत खुलासा करण्यासाठी समितीने पत्रकारांपुढे एकही लेखी पुरावा ठेवला नाही़ देवस्थान समितीचा खुलासा देवस्थानच्या जुन्या दागिन्यांपासून ते २०१२-१३ अखेरचे दागिन्यांचे मूल्यांकन अद्ययावत असून सर्व दागिने सुरक्षा कक्षात आहेत़ चांदीच्या रथासाठी भक्तांकडून देणगी स्वरूपात मिळालेली ४५२ किलो आणि देवस्थान समितीने खरेदी केलेली २० किलोची चांदी वापरली आहे़ चांदीचा रथ सराफ असोसिएशनच्या धर्मकाट्यावर लावूनच सराफ ांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यावर सराफ ांनी चांदी मढवलेली आहे़ जमिनीच्या रॉयल्टीचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे़
जमीन नोंदी, लेखापरीक्षणाचा पत्ता नाही
By admin | Updated: January 14, 2015 01:28 IST