शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - लक्ष्मीपुरीतील गर्दी हटता हटेना, पोलिसांची डोकेदुखी वाढली : भाजीपाला, धान्य खरेदी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:53 IST

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीतील गर्दी हटता हटेना, पोलिसांची डोकेदुखी वाढली भाजीपाला, धान्य खरेदी जोरात

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.

संचारबंदी वाढण्याच्या भीतीने धान्य आणि भाजीपाल्याची अतिरिक्त खरेदी केली जात आहे. जो तो उठतो आणि लक्ष्मीपुरी गाठतो, अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलिसांकडून सातत्याने आवाहन केले जात असतानाही जनता त्यांना अजिबात जुमानताना दिसत नाही.

एकाच ठिकाणी गर्दी करू नका, असे सांगूनही घोळक्याने खरेदी सुरू असल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत नागरिकांना हुसकावण्यास सुरुवात केली. काहीजणांना काठीचे दणकेही दिले. त्यामुळे काहीकाळ पांगापांग झाली; पण परत सगळे रस्त्यांवर आले.

गावबंदी, नाकाबंदी, जिल्हाबंदी झाल्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. धान्याची आवक थांबली असली तरी जीवनावश्यक म्हणून भाजीपाला मात्र बाजारामध्ये येत आहे; पण गिºहाईक नसल्याने बराच भाजीपाला पडून आहे. दरही स्थिरच आहेत. व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने विक्री होत आहे, तर स्वत: विक्री करीत असलेले शेतकरी मात्र पडेल त्या किमतीला विकून लवकर घर गाठणे पसंत करीत आहेत.काकडी ढिगावरपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले गाव हे काकडीसाठी प्र्रसिद्ध आहे. सध्या गाव बंद आहे; पण काकडी हा नाशवंत माल असल्याने गावातूनच टेम्पो भरून महिला कोल्हापूर शहरात येऊन काकडी विकत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस बसू देत नसल्याने मंगळवारी लक्ष्मीपुरीसह आजूबाजूच्या रस्त्याकडेला महिला मोठ्या प्रमाणावर काकडी विक्रीसाठी बसल्या होत्या. ग्राहक नसल्याने किलोऐवजी ढिगावर काकडी विकावी लागत आहे.हमालाची कामे मालकांवरलक्ष्मीपुरी धान्यबाजारात शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील हमाल मोठ्या प्रमाणावर आहेत. वाहतूक व नाकाबंदीमुळे हे हमाल शहरात येऊ शकत नाहीत. त्यामुळे दुकानांच्या मालकांनाच आलेल्या गिºहाइकांना धान्याच्या पिशव्या उचलून द्याव्या लागत आहे.मालाची आवकजावक बंदजीवनावश्यक म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्यांची वाहतूक सुरू राहील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले असले तरी सध्या नाकाबंदीमुळे शहरात येणाºया व जाणाºया वाहनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी मालाची आवकजावक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम आठ दिवसांनंतर दिसण्यास सुरुवात होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार