संस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ संस्थापक संचालक जवाहर शहा यांनी प्रास्ताविकातून संस्थेने सन २०१९/२० या आर्थिक वर्षात २६९ कोटी १३ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला आहे.
संस्थेकडे ५४ कोटी ५६ लाखांच्या ठेवी असून योग्य तारणावर ३६ कोटी ९५ लाखांचे कर्ज वाटप केलेले आहे. यामध्ये २१ कोटी २१ लाखांचे सोनेतारण कर्ज वाटप केलेले आहे. अहवाल सालात ऑडिट वर्ग 'अ' आहे तसेच अहवाल सालात सभासदांच्या हिताच्यादृष्टीने संस्था महोत्सव निधीसाठी नप्त विभागातून १ लाख रकमेची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेत विलास गुरव, रामचंद्र पोळ, विनायक हावळ, दत्तकुमार साबळे, सुदर्शन हुंडेकर आदी. सभासदांनी चर्चेत भाग घेतला. संस्थेचे मॅनेजर नवनाथ डवरी यांनी अहवाल वाचन केले. सभेत संस्थापक संचालक जवाहर शहा , संचालक दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडिस, विनय पोतदार,श्रीमती भारती कामत, चंद्रकांत माळवदे, दत्तात्रय कांबळे, महादेव सणगर, सुजाता सुतार, तज्ज्ञ संचालक जगदीश देशपांडे, किशोर पोतदार तसेच कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी, यांच्यासह सभासदवर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन संचालक चंद्रकांत माळवदे यांनी केले. आभार तज्ज्ञ संचालक किशोर पोतदार यांनी मानले.
फोटो ओळ
मुरगूड येथील लक्ष्मी नारायण संस्थेचे मृत सभासदांच्या वारसांना चेकचे वितरण करताना पुंडलिक डाफळे, जवाहर शहा व अन्य.