मालेतील पाझर तलाव २१ एकर परिसरात विस्तारला असून उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले होते. गेल्यावर्षी पाऊस मोठा प्रमाणात असल्याने जुलै महिन्याच्या सुरुवातीस तलाव भरला होता. यावर्षी दोन दिवसांपासून पन्हाळाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जूनच्या पहिल्या पावसातच मालेगावचा पाझर तलाव भरला असून, तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यातून बाहेर पडू लागले आहे. पन्हाळा तालुक्यात २४ तासांत ११५ मि. मी. पाऊस झाला असून, आजअखेर तालुक्यात २१३ मि. मी. पाऊस झाला आहे.
१७ माले तलाव
( फोटो -- माले ता. पन्हाळा येथील गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. (छाया : संजय पाटील)