शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

कन्यागत महापर्व सुरू

By admin | Updated: August 12, 2016 00:41 IST

पालखी सोहळा थाटात : दत्त नामाचा जयघोष; नृसिंहवाडीत हजारो भाविकांची गर्दी

प्रशांत कोडणीकर -- नृसिंहवाडी --‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ अशा श्री दत्त नामाच्या अखंड जयघोषात आज, गुरूवारी येथील कन्यागत महापर्वकाळ महोत्सवास थाटात प्रारंभ झाला. करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, गाणगापूर येथील वल्लभानंद महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला. दुपारी दोन वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखीतून शाही मिरवणूक शुक्लतीर्थाकडे मार्गस्थ झाली. दत्त मंदिराच्या आवारात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीला पुष्प अर्पण केले. शुक्रवारी सकाळी ६ वा. २० मिनिटांनी शुक्लतीर्थ येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचा गंगास्नानाचा मुख्य कार्यक्रम होईल.गुरुवारी कन्यागत महोत्सवानिमित्त येथे हजारो भाविक दाखल झाले. पहाटेपासून श्री दत्त मंदिर भाविकांच्या गर्दीने खुलून गेले होते. मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोड्शोपचार पूजा मानकरी दिलीप साधूपुजारी यांनी केली. तर रुद्र एकादिशनी मानकरी प्रकाश वासुदेव पुजारी यांच्याकडून करण्यात आली. सकाळी आठ ते अकरा यावेळेत पंचामृत पूजा व अभिषेक झाल्यावर अकरा वाजता अनिल साधूपुजारी यांच्याकडून श्रींची महापूजा करण्यात आली. धूप, दीप, आरती व नैवेद्य झाल्यावर श्रींचा पोशाख होऊन पंचोपचार पूजा व प्रार्थना करण्यात आली. नारायण स्वामी मंदिरासमोर फुलांनी सजविलेल्या पालखीत श्रींची उत्सवमूर्ती मानकरी श्रीकांत वासुदेव पुजारी यांनी ठेवली. त्यानंतर प. पू. रामचंद्रयोगी महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून परंपरेप्रमाणे दुपारी अडीच वाजता श्रींची शाही पालखी मिरवणूक शुक्लतीर्थाकडे मार्गस्थ झाली. श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखी मिरवणुकीने मुख्य मंदिरातून बाहेर पडताना भाविकांनी एकच गर्र्दी केली. दुपारी निघालेली श्रींची उत्सवमूर्तीची पालखी पेठभाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, ओतवाडी भाग मार्गे शुक्लतीर्थाकडे आज, शुक्रवारी पहाटे तीनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण पालखीचा मार्ग कापडी मंडप आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.कन्यागत सोहळा सुनियोजित कार्यक्रमाप्रमाणे होईल, असा विश्वास दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव सोनू ऊर्फ संजय पुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे व उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांनी बोलून दाखविला.कन्यागत महोत्सवासाठी गुरुवारी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशीव साळुंखे, कायर्कारी अभियंता आर. एस. पाटील, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, आदीं मान्यवरांनी हजेरी लावली.कन्यागत सोहळ्यात आजचे कार्यक्रम१) कन्या या राशीमध्ये गुरुवारी रात्री गुरू हा ग्रह प्रवेश करीत आहे. सोहळ्यासाठी सूर्य प्रमाण असलेने सकाळी सूर्योदयावेळी सकाळी ६.२० वाजता शुक्लतीर्थ येथे ‘श्रीं’चे उत्सवमूर्तीस विधिवत ब्रह्मवृंद यांच्या मंत्र घोषात स्नान होईल.२) पर्वकाळ स्नानासाठी ‘श्रीं’चे उत्सवमूर्तीसोबत येथील परंपरेनुसार मानकरी, खातेदार यांच्यासह दहा व्यक्तींना होणार स्नानाचा लाभ.३) ‘श्रीं’चे पर्वकाळ स्नान झाल्यावर कृष्णा तीरावर हजारो भाविक करणार पर्वकाळ स्नान.४) कन्यागत सालातील चातुर्मासासाठी आलेले करवीर पीठाचे जगद्गुरू श्री विद्या नृसिंह भारती, दामोदरानंद महाराज व गाणगापूर येथील वल्लभानंद महाराज यांच्या उपस्थितीत होणार कन्यागत महापर्वकाळ स्नान.५) ‘श्रीं’च्या उत्सवमूर्तीस शुक्लतीर्थावर पर्वकाळ स्नान झाल्यावर पुण्याहवाचन, गंगापूजन, असे पूर्व पारंपरिक धार्मिक कार्यक्रम ६) धार्मिक विधी झाल्यावर अंदाजे सकाळी दहा वाजता ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन मुख्य मंदिरात परतण्यासाठी मिरवणुकीने निघेल.महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातून भाविक दाखलश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाळाच्या स्नानासाठी कृष्णा पंचगंगा नदीला पूर असूनदेखील महाराष्ट्र, कर्नाटक,गोवा, गुजरात, आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने दि. १२ रोजी च्या स्नानासाठी हजेरी लावली आहे.गल्लोगल्ली श्रावण महिना असल्याने महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून आनंद साजरा केला. गल्लीभर धोतर, साडी, पैठणीच्या घातलेल्या पायघड्या व रंगबेरंगी रांगोली लक्ष वेधून घेत होत्या. पोलिस तसेच व्हाईट आर्मी, महाराष्ट्र कमांडो फोर्स, एन.सी.सी., जीवन ज्योती, विद्यार्थी स्वयंसेवक व गावातील तरुण मंडळे यांच्यामार्फत पालखी मार्ग व अन्नछात्र, नदी काठ, आदी ठिकाणी यंत्रणा सुरक्षा ठेवण्यात आली. नृसिंहवाडी येथील महिला व मुलींनी रचलेल्या वेदमंत्र या ढोल पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून भाविकांचे लक्ष वेधले.गंगास्नानाचा आज मुख्य कार्यक्रमपालखी मिरवणूक शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास शुक्ल तीर्थावर पोहोचल्यानंतर विश्रांती, कीर्तन व धार्मिक विधी झाल्यानंतर सूर्योदयावेळी ६.२० च्या दरम्यान श्रींच्या उत्सवमूर्तीस शुक्लतीर्थावर गंगास्नान घालण्याचा मुख्य विधी, पुण्याहवाचन, गंगापूजन असे पूर्व पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी शुक्लतीर्थावर शामियाना उभारला आहे. तेथे श्रींच्या उत्सवमूर्तीच्या स्नानासाठीची तयारी सुसज्ज ठेवली आहे. मानकरी ब्रह्मवृंदांकडून श्रींच्या उत्सवमूर्तीस मंगलस्नान होणार आहे. त्यानंतर भाविकांच्या पवित्र गंगास्नानास प्रारंभ होईल. भाविकांनी श्रींच्या मुख्य मंदिरासमोरील घाटावर स्नान करावे, असे आवाहन दत्त देव संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे. सकाळी दहानंतर श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखी परत मुख्य मंदिरात येण्यासाठी निघणार आहे. शुक्रवार महोत्सवाचा मुख्य दिवस असून, गुरुवारी सायंकाळपासून भाविक आले आहेत. शुक्रवारी श्रींचे पर्वकाळस्नान झाल्यावर हजारो भाविक कृष्णा-पंचगंगा संगम तीरावर ‘कन्यागत पर्वकाळ स्नानाचा’ लाभ घेणार आहेत.