शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड : Ganpati Festival मजरेवाडीत हिंदू बांधवांकडून मशिदीची उभारणी : गावामध्ये एकही मुस्लिम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:59 IST

राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र,

ठळक मुद्दे मशिदीची पडझड झाल्याने वर्गणी काढून उभारणी, प्रत्येक गुरुवारी पूजाअर्चा ग्रामस्थांनी मुस्लिम धर्माचा केलेला आदर जातीयवादाचे लोण पसरविणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा

गणपती कोळी ।कुरुंदवाड : राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र, या सर्व प्रकाराला मजरेवाडी (ता. शिरोळ) गावाने मूठमाती दिली आहे. गावामध्ये एकही मुस्लिम नाही, तरीही हिंदू बांधवांनी एकत्र येऊन गावामध्ये मशीद उभारली आहे.

मशिदीत गणपती बसविणे, पीर पंजा बसविणे, मुस्लिम धर्माप्रमाणे पूजाअर्चा करण्याचे सर्व काम हिंदू लोक भक्तिभावाने करतात. त्यामुळे या गावाचा आदर्श देशबांधवांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.शहरापासून तीन कि़ मी. अंतरावर दक्षिणेस असलेले मजरेवाडी गाव अवघ्या चार ते पाच हजार लोकवस्तीचे. सर्वच समाजासह बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मात्र, या गावामध्ये पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाचे एकही घर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कुरुंदवाडच्या पटवर्धन संस्थानिकांच्या अधिपत्याखाली हे गाव होते. गावात शेकडो वर्षांपासून मशीद होती. या मशिदीत पटवर्धन संस्थानिकांचा सरकारी पीर पंजा मोहरम काळात बसविला जात असतो. याची सर्व व्यवस्था संस्थानकाळात संस्थानिक पाहत होते.

स्वातंत्र्यांनतर संस्थाने खालसा झाली. या मशिदीकडे मुस्लिम समाजच नव्हे, तर पटवर्धन संस्थानिकांच्या वारसांचेही दुर्लक्ष झाले. मात्र, या मशिदीबाबत व पिराविषयी ग्रामस्थांची श्रद्धा कधी कमी झाली नाही. मशिदीच्या पडझडीमुळे गावातील हिंदू बांधवांनी शासकीय निधीची वाट न पाहता वर्गणी काढून चार वर्षांपूर्वी आठ लाख रुपये खर्च करून मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार नव्याने मशीद बांधून मुस्लिम धर्माचा आदर केला आहे.

प्रत्येक गुरुवारी मशिदीमध्ये पूजाअर्चा केली जाते. मशिदीचे पुजारी हे मुस्लिम समाजातील लागत असल्याने पूजाअर्चाचे काम कुरुंदवाडमधील दस्तगीर हसन मुल्ला पाहत आहेत. गावातील महत्त्वाच्या बैठका, निर्णय, चर्चासत्र या मशिदीमध्येच बसून ग्रामस्थ घेत असतात. एकीकडे नवीन पिढी जातीयवादाकडे अधिक आकर्षिली जात असताना या गावातील तरुण पिढीने मात्र पूर्वजांच्या प्रथेनुसार मशिदीची धार्मिक परंपरा कायम राखली आहे. या मशिदीत प्रत्येकवर्षी ग्रामस्थ गणेशाची प्रतिष्ठापना करतात. पीर पंजाही बसवून सर्व विधिवत कार्यक्रम होतात. त्यामुळे ग्रामस्थांनी मुस्लिम धर्माचा केलेला आदर जातीयवादाचे लोण पसरविणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

या मशीद नियोजन समितीचे अध्यक्ष बापूसो हेरवाडे आहेत. कल्लाप्पा मरजे, आण्णासो बुबनाळे, रामचंद्र आणुरे, सुभाष बंडगर, प्रकाश बसर्गे, अनिल पट्टेकरी, मयूर पट्टेकरी, बाळासो बंडगर, शहानवाज गवंडी, आदी ज्येष्ठ मंडळी काम पाहत आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरHinduहिंदू