शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केएमटीचा १९ गावांना ‘ब्रेक’!

By admin | Updated: May 30, 2014 01:56 IST

रविवारपासून अंमलबजावणी : एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बससेवा बंद

कोल्हापूर : के.एम.टी.कडे असणार्‍या खासगी ठेकेदारांनी थकबाकीसाठी २० मे पासून ३० बसेसची सेवा बंद केली आहे. परिणामी, शहरातील मार्गांवर प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी के.एम.टी. प्रशासनाने नव्या बसेस येईपर्यंत ग्रामीण भागातील १९ गावांतील बससेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील अनेक बसमार्गांत बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन के.एम.टी. प्रशासनाने केले आहे. के.एम.टी.कडे असणार्‍या ३० खासगी बसेस ठेकेदारांनी एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बससेवा बंद केली आहे. यामुळे दररोज किमान सव्वादोन लाखांहून अधिकचे नुकसान सोसणार्‍या के.एम.टी.पुढील अडचणी वाढल्या. यातच ८५० कर्मचार्‍यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. के.एम.टी.च्या बॅँकेतील खात्यावर एक रुपायाही नाही. कालचे उद्या भागवून विनंतीवर डिझेल घेऊन कसाबसा के.एम.टी.चा प्रवास सुरू आहे. के.एम.टी.च्या अडचणींमुळे प्रवाशांचे हाल नकोत, यासाठी काही भागांतील बससेवा बंद करणे, तसेच शहरातील काही मार्गांत बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. के.एम.टी.च्या ताफ्यात नवीन बसेस येईपर्यंत हा बदल राहणार असल्याचे व्यवस्थापनाने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)