शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापूर : ‘केएसबीपी’तर्फे २४ पासून फ्लॉवर फेस्टिव्हल, जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:02 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत असल्याची माहिती केएसबीपी व कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलीस उद्यानात आयोजन; पर्यटन वाढीसाठी प्रयत्नकेएसबीपी, कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत असल्याची माहिती केएसबीपी व कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली.पित्रे म्हणाले, गेल्या वर्षभरात ‘केएसबीपी’तर्फे कोल्हापुरातील रस्ते व चौकांचे सुशोभीकरण केले. ते सुस्थितीत राहण्यासाठी त्याची योग्य देखभाल ‘केएसबीपी’ कडून केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच व देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३०३ फूट उंच ध्वजस्तभांची उभारणी व १ लाख चौरस फूट उद्यानाच्या निर्मितीचेही काम ‘केएसबीपी’ने केले आहे.

त्यामुळे पर्यटनवाढीस नवी दिशा मिळाली. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवार (दि. २४) पासून येथील पोलीस उद्यानात फ्लॉवर फेस्टिव्हल होत आहे. या फेस्टिव्हलची सुरुवात ताराराणी चौकातून फ्लॉवर परेड, कार्निव्हलने होणार आहे.

या पत्रकार परिषदेस ‘केएसबीपी’चे सचिव राहुल कुलकर्णी, नर्सरी असोसिएशनतर्फे संतोष लोबो, रसिया पडळकर, विजय मळगे, दीपक सुतार, आर्किटेक्ट संतोष रामाने, आर्किटेक्ट अभिनंदन जाधव, शिल्पकार मंगेश कुंभार, राहुल बहिरशेट, महेश माळी, शेखर वळीवडेकर, राहुल मोरे, आदी उपस्थित होते.फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये..

  1. - भव्य चित्ररथ, फुलांनी सजविलेली वाहने, शालेय मुलांचे समूह नृत्य, २४ फूट हत्ती, २० फुटाची बैलगाडी, अनेक आकर्षक व आश्चर्यकारक कलात्मक रचना 
  2. - तज्ज्ञांची भाषणे व सादरीकरण, करिअरच्या नव्या वाटा व त्याबाबत मार्गदर्शन तसेच गृहिणींच्या कलागुणास वाव देणाऱ्या व्यवसायासंबंधी सल्ला व मार्गदर्शन 
  3. -समूह नृत्य, कॉमेडी शो, सुगम संगीत तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम 
  4. -विज्ञान, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, फेस पेंन्टिग तसेच विविध विषयांवर आधारित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा 
  5. -देशी, विदेशी फुलांनी बनविलेली १२ फूट रुंद व २४ फूट लांब धरणाची प्रतिकृती
  6. - राजर्षी शाहू महाराजांचा ९ फूट उंचीचा फुलांनी सजविलेला भव्य पुतळा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर आधारित फुलांनी केलेली कलात्मक रचना 
  7. -१ लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन