शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

केएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामना : खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:08 IST

केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३ - २ अशा गोल फरकाने मात केली.

ठळक मुद्देकेएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामना : खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विजयीआघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळी

कोल्हापूर : केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३ - २ अशा गोल फरकाने मात केली.छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसएच्यावतीने वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यामध्ये सामना खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांमधील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळी करीत सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सामन्याच्या आठव्या मिनिटाला खंडोबा तालीम मंडळाच्या सूर्यप्रकाश सासनेने गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. गोलची परतफेड करण्यासाठी मंगळवार पेठ फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये आदित्य लाडने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोल फरकाने बरोबरीत केला.पुढच्याच मिनिटाला खंडोबा ‘ब’ संघाच्या दिग्विजय असणेकर याने गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरदेखील दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला मंगळवार पेठ संघाकडून महेश चोरगेने गोल नोंदवीत सामना २-२ अशा गोल फरकाने बरोबरीत केला. मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत होता.उत्तरार्धात दोन्हीही संघांतील खेळाडूंनी चढाईत सातत्य ठेवत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘खंडोबा’कडून प्रणव घाडगे, प्रथमेश पाटील, तर मंगळवार पेठकडून नितीन पोवार, आदिल लाड, महेश चोरगे यांनी शर्तीचे प्रयत्न सुरूकेले. मात्र, त्यांच्या चढाया फोल ठरल्या. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या रुद्रेश मांद्रेकर याने संघाचा तिसरा गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.सामन्याला दोन दिवस सुट्टी३१ डिसेंबर व एक जानेवारी रोजी सामन्याला सुट्टी राहील. दोन जानेवारी रोजी कोल्हापूर वि. मंगळवारपेठ, दुपारी २ वा., पीटीएम अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, दुपारी ४ वा. यामध्ये सामना खेळविण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर