शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केएसए फुटबॉल लिग: शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ, झुंजार क्लब संघांची प्रतिस्पर्धी संघावर मात

By संदीप आडनाईक | Updated: December 19, 2023 19:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजीत शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये शिवाजी तरुण ...

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजीत शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ आणि झुंजार क्लब संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.शाहू मैदानावर मंगळवारी तिसरा सामना शिवाजी विरुद्ध सयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळवण्यात आला. शिवाजीच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ केला. सामन्यात तिसऱ्या मिनीटाला शिवाजी मंडळाच्या संकेत अनिल साळोखेच्या पासवर संकेत नितिन साळोखे याने गोल नोंदवला. सामन्याच्या १९ व्या मिनीटाला लहान डी मध्ये शिवाजीच्या विशाल पाटील याने चेंडू हाताने हातळल्यामुळे जुना बुधवारला पेनल्टी मिळाली. या संधीचे सोने करत सोनम शेरफा याने गोल केला आणि बरोबरी साधली. पण ३९ मिनीटाला परत संकेत अनिल साळोखेने दिलेल्या पासवर संतेक नितीन साळोखे यानेच दुसरा गोल केला. पुर्वांधात शिवाजी संघ २-१ असे आघाडीवर राहीला. उत्तरार्धा ४८ व्या मिनीटाला शिवाजीच्या संकेत साळोखेने वैयक्तीक गोल करत संघाची पकड मजबूत केली. ६५ व्या मिनीटाला शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेने मैदानी गोल करत ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटी सामना शिवाजीने ४-१ असा सहज जिंकला. जुना बुधवारच्या थापा याला रेड कार्डया सामन्यात पुर्वांधामध्ये शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेला धोकादायकपणे अडवल्याबद्धल जुना बुधवारच्या नितेश थापा याला रेड कार्ड देण्यात आले. कोल्हापूर पोलीस, सोल्जर्स पराभूतदरम्यान, सकाळी झालेला संध्यामठ विरुद्ध कोल्हापूर पोलीस यांच्यातील पहिला सामना संध्यामठने ६-१ असा एकतर्फी जिंकला. संध्यामठकडून कपिल शिंदे याने १६ व २४ व्या मिनीटाला, हर्ष जरगने ३६, सिद्धेश साठे याने ६४, कपिल शिंदे ६१, यश जांभळे ८० व्या मिनीटाला गोल केले. पोलीसकडून आदित्य लाड याने एकमेव ५० व्या मिनीटाला गोल केला. दुपारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात झुंजार क्लब विरुद्ध सोल्जर्स सामना टायब्रेकरवर झुंजारने ५ विरुद्ध ४ गोलफरकाने जिंकला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल