शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीतून के.पी.च : ‘ए. वाय.’ यांना विधानपरिषद, ‘बिद्री’ चे अध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:10 IST

आज, बुधवारी आमदार हसन मुश्रीफ करणार आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना थांबविण्यात आले असून त्यांना ‘बिद्री’च्या अध्यक्षपदाबरोबरच विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द पक्षाध्यक्ष पवार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देघोषणा आज -चर्चेत शरद पवार यांच्या सभेचे आगमनाची तसेच प्रचार मुद्द्यांवर चर्चा

कोल्हापूर : राधानगरी मतदारसंघातील उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांत निर्माण झालेला गुंता मंगळवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर इस्लामपूरमध्ये सुटला. माजी आमदार के. पी. पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय झाला असून, त्याची अधिकृत घोषणा आज, बुधवारी आमदार हसन मुश्रीफ करणार आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना थांबविण्यात आले असून त्यांना ‘बिद्री’च्या अध्यक्षपदाबरोबरच विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द पक्षाध्यक्ष पवार यांनी दिला आहे.

के. पी. व ए. वाय. यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. मध्यंतरी पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, चर्चा करून ‘बिद्री’ कारखान्याचे अध्यक्षपद देण्याची सूचना त्यांनी मुश्रीफ यांना केली होती; पण ज्या काही तडजोडी करायच्या, त्या पवार यांच्यासमोरच करूया, अशी भूमिका ए. वाय. यांनी घेतल्याने मंगळवारी पाटील यांच्यासह मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी इस्लामपुरात पवार यांची भेट घेतली.

के.पीं.ची ए. वाय. यांच्या निवासस्थानी भेटमंगळवारी सायंकाळी सात वाजता के. पी. पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह ए. वाय. यांच्या भेटीसाठी सोळांकुरात आले; परंतु सोळांकुर गावातील युवकांनी ए. वाय. यांची उमेदवारी रोखण्याच्या निषेधार्थ तीव्र भावना व्यक्त केल्या. या तरुणांना सरपंच आर. वाय. पाटील यांनी प्रबोधन करून शांत करण्याचा प्रयत्न केला. ए. वाय. पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना उद्या एकत्र करून प्रचाराची रणनीती ठरविणार आहेत. एक तास चाललेल्या चर्चेत शरद पवार यांच्या सभेचे आगमनाची तसेच विविध प्रचार मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व कार्यकर्त्यांना संघटित करून मेळावा घेण्याचे नियोजन या बैठकीत झाले.

पक्षाध्यक्ष शरद पवार व आमदार हसन मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानून पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. निवडणूक लढवायचीच अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याने त्यांची समजूत काढून कामाला लावावे लागेल. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्टवादी कॉँग्रेस

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक