शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या वैष्णवी, कल्याणीची भारतीय रग्बी संघात वर्णी, चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी निवड

By सचिन भोसले | Updated: September 13, 2023 22:51 IST

या निवडीची घोषणा बुधवारी रात्री बोरनिओ (मलेशिया) येथे झालेल्या सराव शिबीरादरम्यान करण्यात आली.

कोल्हापूर : चीन येथे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय रग्बी संघ सहभागी होत आहे. त्यात कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील व कल्याणी पाटील या दोघींची भारतीय संघात निवड जाहीर झाली. या निवडीची घोषणा बुधवारी रात्री बोरनिओ (मलेशिया) येथे झालेल्या सराव शिबीरादरम्यान करण्यात आली.रग्बी इंडिया तर्फे ३० जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीत पश्चिम बंगाल येथे भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर आयोजित केले होते. यात विविध राज्यातील ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यातून गेल्या दहा दिवसांपासून बोरनिओ (मलेशिया) येथे निवड १७ खेळाडूंचे सराव शिबीर दक्षिण आफ्रीकेचे लुद्रीक यांच्या उपस्थितीत विशेष शिबीर आयोजित केले होते. त्यातून मंगळवारी १२ जणांचा भारतीय रग्बी संघ निवडण्यात आला. त्यात कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील व कल्याणी पाटील या दोघींची या संघात वर्णी लागली. वैष्णवीने यापुर्वी उझबेकिस्तान, जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या संघात प्रतिनिधीत्व केले होते. तर कल्याणीने बोर्निओ (मलेशिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दमदार कामगिरी केली होती.

यासह राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतही केलेल्या कामगिरीची दखल घेवून या दोघींची भारतीय संघात सरावासाठी प्रथम निवड करण्यात आली होती. त्यातील उल्लेखनिय कामगिरी आणि परदेशातील सराव शिबीरातील कामगिरीची दखल घेवून अंतिम संघात निवड करण्यात आली. या दोघींना रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहूल बोस, महाराष्ट्र रग्बीचे नासिर हुसेन, संदीप मोसमकर, प्रशिक्षक सुरजित घोष, सुरभी दाते, असोसिएशनचे पेट्रन चिफ मालोजीराजे, मधुरिमाराजे, अध्यक्ष प्रा. अमर सासने, प्रशिक्षक दीपक पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchinaचीनAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३