शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

ताकदीसोबतच चपळाई; डोळ्यांत धग अन् अंगात ‘रग’बी, कोल्हापूरच्या वैष्णवी, कल्याणी आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात

By सचिन भोसले | Updated: September 21, 2023 13:29 IST

सचिन भोसले कोल्हापूर : रग्बी हा खेळ ताकदीसोबतच चपळाईने खेळला जाणारा खेळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः परदेशात हा खेळ ...

सचिन भोसलेकोल्हापूर : रग्बी हा खेळ ताकदीसोबतच चपळाईने खेळला जाणारा खेळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः परदेशात हा खेळ लोकप्रिय ठरला आहे. अशा ताकदीच्या खेळात प्राविण्य मिळवायचे म्हणजे तेवढ सोप काम नाही. अशा दमदार खेळात पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील वैष्णवी दत्तात्रय पाटील व कल्याणी कृष्णात पाटील या दोघींनी कोल्हापूरचा झेंडा अटकेपार नेला आहे. या दोघींची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. दोघीही बुधवारी चीनला रवाना झाल्या. 

रग्बी तसा ताकदीचा खेळ. यात समोरच्या व्यक्तीला प्रसंगी उडवून पुढे जावे लागते. त्यामुळे अंगमेहनत आणि प्रचंड ऊर्जा शरीरात असावी लागते. त्यासाठी खुराक आणि सरावही महत्त्वाची बाब आहे. परदेशी लाेकांना या सर्व बाबी सहज उपलब्धही होतात. मात्र, भारतात आणि त्यात कोल्हापुरातील छोटेसे गाव असलेल्या पाडळी खुर्द (ता. करवीर) मध्ये अशक्य गोष्ट आहे. अशक्य वाटणारी ही गोष्ट साध्य वैष्णवीने साध्य केली आहे.

रग्बी खेळासाठी एका शाळेत वैष्णवीने प्रवेश घेतला. त्यासाठी सराव सातत्य आवश्यक म्हणून ती मैदानावर दिसू लागली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवडेना. त्यांनी तक्रार केली. मग तिने तर शाळाच सोडण्याचा निर्णय घेतला. मग सुरू झाला खरा संघर्ष. तीने पाडळी ते कोल्हापूर असे वीस किलोमीटर सायकलवरून शाळेला येण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक पाटील व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. अमर सासने यांच्या सहकार्याने तिने या खेळात मागे वळून बघितले नाही. सात राष्ट्रीय आणि ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने चमकदार कामगिरी केली आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे तिचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात.अशीच गाथा तिची साथीदार कल्याणी कृष्णात पाटील हिचीसुद्धा आहे. सारवायचे घर आणि बसायला गोधडी असे अत्यंत साधे घर आहे. साताविश्व दारिद्र्य अशी परिस्थिती आहे. तिचे वडील तर सुरक्षारक्षक म्हणून मिळेल तेथे काम करतात, तर आई शेतमजूर म्हणून काम करते. तिचे घर वडिलांच्या तुटपुंज्या पगारात आणि दुधाच्या पैशावर घर चालते. तीही शिवाजी पेठेतील न्यू काॅलेजमध्ये शिकते. पैशाअभावी एकवेळ तर खेळ आणि काॅलेज सोडून जायचा, असा निर्णय तिने घेतला होता. ही बाब प्रशिक्षक पाटील व प्रा. सासने यांना समजल्यानंतर त्यांनी प्रिन्स मराठा बोर्डिंग हाउस संस्थेमार्फत वर्षभराचा खर्च उचलला आणि आज तीही चीनला वैष्णवीसोबत रवाना झाली.

सराव असा..दोघीही पाडळी ते न्यू काॅलेज, शिवाजी पेठ सायकलवरून येतात. तिथे इतर मुलींसोबत ५०० सपाट्या, जोर बैठका, जीमचा व्यायाम, धावणे असा पुरुषांनाही लाजवेल असा व्यायाम करतात.

ज्या परिस्थितीतून आम्ही आलो आहोत. त्याची जाण आहे. या स्पर्धेत देशाला पदक जिंकून देणार आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार करणार. - वैष्णवी पाटील, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू 

आई-वडिलांची जबाबदारी आणि सासने, पाटील सरांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. देशासाठी जिवाचे रान करून पदक जिंकून आणणारच. - कल्याणी पाटील, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर