कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार या पुस्तक रुपाने शरद तांबट यांनी युवा पिढीसमोर आणत इतिहास पुन्हा जिवंत केला. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्हिनस कॉर्नर येथील लोटस प्लाझा येथे शनिवारी आयोजित केलेल्या ११९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.आमदार पाटील म्हणाले, विल्सन यांचा पुतळा काढून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिकांनी केले. हा इतिहास ही या पुस्तक रुपाने युवा पिढीसमोर आला आहे. हा निश्चितच अभ्यासण्यासारखा आहे. स्वातंत्र्यसेनानींची नावे कायम चिरस्मरणात राहण्यासाठी वर्दळीच्या चौकात नावे असलेली शिळा उभी करू. त्या रुपाने ही नावे आजच्या व उद्याच्या पिढीला कायम लक्षात राहतील. अशी ग्वाही दिली.स्वागत चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने व प्रास्ताविक अनिल घाटगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, खेलो इंडिया (नवी दिल्ली) चे संचालक सतीश बागल, आर.डी.पाटील, रावसाहेब पाटील या प्रमुख मान्यवरांसह स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार पुस्तक प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:25 IST
literature Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार या पुस्तक रुपाने शरद तांबट यांनी युवा पिढीसमोर आणत इतिहास पुन्हा जिवंत केला. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्हिनस कॉर्नर येथील लोटस प्लाझा येथे शनिवारी आयोजित केलेल्या ११९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार पुस्तक प्रकाशन
ठळक मुद्दे१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार पुस्तक प्रकाशनआजच्या पिढीसमोर स्वातंत्र्य लढा पुन्हा जिवंत झाला :ऋतुराज पाटील