शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेट २५ वरून १८ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वरून १८ टक्क्यांवर आली असून, यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वरून १८ टक्क्यांवर आली असून, यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मृत्युदरदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असून, त्यातील ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्ध व ७० टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त नागरिकांचे झाले आहेत.

जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख ४५ हजार २१५ इतकी असून, कोरोनाची पहिली व दुसरी लाट असे मिळून एक लाख १२४ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्ण १४ हजार ८४४ इतके आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ४४८ मृत्यूपैकी ४२४ मृत्यू हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, घरीच उपचार करणे, आजाराची माहिती लपविणे, सामाजिक भीती अशी अनेक कारणे यामागे आहेत.

लसीकरणात जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार ६५० नागरिकांनी पहिला डोस, तर २ लाख २८ हजार ८९४ लोकांनी दुसरा डोस घेतला असून, ही टक्केवारी लोकसंख्येच्या २८ टक्के इतकी आहे.

----

आरोग्य यंत्रणा झाली सक्षम

ऑक्सिजन बेड : आयसीयू बेड : व्हेंटिलेटर बेड : ऑक्सिजनची उपलब्धता

पहिली लाट : २ हजार ३९६ : ३५० : १४० : २८ मेट्रिक

दुसरी लाट ३ हजार १७४ : ६४८ : ३०० : ५२ मेट्रिक टन

कोविड काळजी केंद्रे : ८३

समर्पित कोविड केंद्रे : ९३

कोविड रुग्णालये : १२

जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची उभारणी सुरू

---