शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल : संजय मोहिते

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

‘अपना सपना फनी, फनी’ हे नाटक. धम्माल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या नाटकाचा ‘जागतिक रंगभूमी दिनी’ -थेट संवाद...

कोल्हापुरातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मरगळ आलेली असताना कोल्हापुरातील जे काही होतकरू कलाकार व संस्था या क्षेत्रात यशस्वीरित्या धडपडत होते, त्यातील एक नाव म्हणजे संजय मोहिते. ‘फिनिक्स क्रिएशन’ या संस्थेद्वारे ‘सोकाजीराव टांगमारे’सारख्या विनोदी व्यावसायिक नाटकापासून ते राज्य नाट्यमधील ‘मीटर डाऊन आॅफ बीट’ नाटकानंतर संजय घेऊन येत आहे ‘अपना सपना फनी, फनी’ हे नाटक. धम्माल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या नाटकाचा ‘जागतिक रंगभूमी दिनी’ म्हणजे शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : अभिनय क्षेत्रात तुझ्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?उत्तर : माझं गाव आरे. या गावाला धार्मिक, सांस्कृतिक वारसा आहे. माझे आजोबा सोंगी भजनाचे कार्यक्रम करायचे. त्यामुळे मीदेखील ते करू लागलो. ते बंद झाल्यानंतर रेकॉर्ड डान्स स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो. पण शाळा, महाविद्यालयांत गॅदरिंगवर बंदी आल्याने तेही थांबले. मला याच क्षेत्रात काही तरी करायचे होते. एका डान्स स्पर्धेला पौर्णिमा खटावकर आणि प्रकाश हिलगे हे परीक्षक होते, त्यांनी माझा डान्स पाहिला आणि आॅर्केस्ट्राची आॅफर दिली. मलाही ते हवेच होते. नऊ वर्षे मी आॅर्केस्ट्रामध्ये असल्याने नृत्य, वाद्ये, निवेदन, अभिनय असे कलेचे सगळे प्रकार हाताळले. आॅर्केस्ट्रापुरते विश्व मर्यादित राहू नये, यासाठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागाची चाचपणी करू लागलो. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य तरुण मंडळाचे ‘निष्पाप’ हे माझे पहिले नाटक. त्यानंतर ‘इच्छा माझी पुरी करा’, ‘धरणाखालच्या अंधारातून’, ‘कथा नामा जोग्याची’, ‘कन्यादान’, ‘जोडीदार’ ही नाटके केली अन् बक्षिसे मिळत गेली. अशारितीने माझे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले.प्रश्न : ‘सोकाजीराव टांगमारे’ची निर्मिती कशी झाली?उत्तर : मला राज्य नाट्य स्पर्धेपुरते मर्यादित राहायचे नव्हते. कलाकार म्हणून मला वैयक्तिकरीत्या अभिनयासाठी विचारणा होत होती; परंतु नाटकामध्ये सातत्य राहावे, ही तळमळ असल्याने मी नाटकांची आवड असलेल्या मुला-मुलींना एकत्र केले आणि २००७ मध्ये ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकाची निर्मिती झाली. द. मा. मिरासदारांनी लिहिलेले हे नाटक पूर्वी निळू फुले करायचे. नंतर ते बंद पडले होते. एकदा माझ्या वाचनात ही स्क्रीप्ट आली. त्यात नावीन्याची भर टाकली आणि ‘सोकाजीराव’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाने आम्हाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवून दिले. विविध पुरस्कारांबरोबरच अन्य शहरांतही नाटकाने गर्दी खेचली. आजवर त्याचे दोनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. प्रश्न : आगामी ‘अपना सपना फनी-फनी’मधून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार?उत्तर : प्रत्येक माणूस स्वप्न बघत असतो. किंबहुना, स्वप्नाशिवाय आयुष्य नाही, असेच एक स्वप्न पाहिलेल्या जोडप्याच्या आयुष्यात त्या स्वप्नामुळे काय धम्माल घडते, याची मांडणी म्हणजे ‘अपना सपना फनी फनी’. कोल्हापूरला वगनाट्याची परंपरा आहे. त्यामुळे गाण्यांचा समावेश असलेले हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे असेल. धकाधकीच्या जीवनात मन:शांतीसाठी योगा, ध्यानधारणाची गरज असते. त्यातून मिळणारी अनुभूती हे नाटक प्रेक्षकांना देईल, असा माझा विश्वास आहे. प्रश्न : कोल्हापुरात नाटकांना प्रतिसाद मिळत नाही, असा संस्थांचा आक्षेप आहे. तुझे मत काय?उत्तर : मुंबई-पुण्यात शहरातल्या शहरात दिवसा शूटिंग आणि रात्री नाटके असे सर्वसाधारणपणे कलाकारांचे शेड्यूल असते. परगावी जायचं म्हणजे वेळ जातो. शिवाय सगळा सेटअप न्यावा लागतो. केशवराव भोसले नाट्यगृहाची क्षमताच कमी आहे. त्यात शाहू स्मारकची त्याहून कमी. त्यामुळे येथे नाटक सादर करणे संस्थांना परवडत नाही. परंतु, भविष्यात ही परिस्थिती बदलेल आणि कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल, असा माझा विश्वास आहे. - इंदुमती गणेश