शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे पासपोर्ट कार्यालय मंगळवारपासून पुन्हा सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:16 IST

coronavirusunlock, passportoffice, sanjaymandlik, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय मंगळवार (१ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुण्याला जाण्याचे हेलपाटेही वाचले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरचे पासपोर्ट कार्यालय मंगळवारपासून पुन्हा सेवेतकोविडमुळे सात महिन्यांपासून होते बंद

कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय मंगळवार (१ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुण्याला जाण्याचे हेलपाटेही वाचले आहेत.

शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उपचार, सहल, नातेवाइकांची भेट, आदी कारणांसाठी कोल्हापुरातून परदेशांत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही जास्त आहे; पण कोल्हापुरात कार्यालय नसल्याने पुण्याला जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. कोल्हापुरातील वाढती संख्या लक्षात घेऊन ज्ञानेश्वर मुळे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून कसबा बावड्यातील पोस्टाच्या कार्यालयातच २०१४ साली पासपोर्ट कार्यालय सुरू झाले.या कार्यालयातून रोज २०० जणांना अपाइंटमेंट दिली जात होती. दरमहा २० ते २५ हजार पासपोर्ट निघत होते. मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला आणि हे कार्यालयच बंद झाले. तेव्हापासून आजतागायत ते बंदच असल्याने तातडीने पासपोर्ट हवा असल्यास पुण्यातील कार्यालयाकडे जावे लागत होते. अन‌्लॉकच्या दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाला परवानगी दिल्याने पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

पुण्यातील कार्यालयही सुरू झाले. त्यामुळे कोल्हापुरातून ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. शुक्रवारीच (दि. २७) संजय घाटगे यांनी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंतीही केली होती. कोल्हापुरातून झालेल्या पाठपुराव्यामुळे अखेर हे कार्यालय पुन्हा सुरू होत आहे. 

टॅग्स :passportपासपोर्टSanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूर