शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कोल्हापूरचे ‘ब्रँडिंग’, ‘मार्केटिंग’ हवे--पर्यटनदिनाच्या चर्चासत्रातील सूर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये जे-जे काही आहे ते-ते एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. फक्त त्याचे ‘बँ्रडिंग’ आणि ‘मार्केटिंग’ करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक पर्यटनदिनी आयोजित चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आला.कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि पथिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुधवारी झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत ...

ठळक मुद्देहॉटेल मालक संघ, पथिक प्रतिष्ठानचा उपक्रमआम्ही केवळ व्यवसाय म्हणून पर्यटन विकासाकडे पाहात नाही तर सामूहिक लाभासाठी आम्ही कार्यरत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये जे-जे काही आहे ते-ते एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. फक्त त्याचे ‘बँ्रडिंग’ आणि ‘मार्केटिंग’ करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक पर्यटनदिनी आयोजित चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आला.

कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि पथिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुधवारी झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत होते. विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी अतिशय मौलिक सूचना केल्या.यावेळी अरुणा देशपांडे, स्वयंसिद्धाच्या तृप्ती पुरेकर, प्राची देशपांडे, पल्लवी कोरगावकर आणि अमरजा निंबाळकर या पर्यटनक्षेत्रामध्ये कार्यरत असणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच अंध आणि अपंग असूनही या क्षेत्रात उत्तम काम करणारे संतोष परीट, तानाजी पोवार, राधानगरी पर्यटनाचे अ‍ॅप तयार करणारा विशाल घोलकर यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर म्हणाले, गेली अनेक वर्षे आम्ही कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी कार्यरत आहोत. आता याबाबत जागरूकता आली असून अनेक व्यक्ती, संस्था आमच्यासोबत आहेत. याही पुढे आमचा सर्वांना पाठिंबा असेल. सचिव सिद्धार्थ लाटकर म्हणाले, आम्ही केवळ व्यवसाय म्हणून पर्यटन विकासाकडे पाहात नाही तर सामूहिक लाभासाठी आम्ही कार्यरत आहोत.वासीम सरकवास म्हणाले, विदेशी पर्यटकांनाही कोल्हापूरची भुरळ पडली आहे. विश्वजित घाटगे म्हणाले, शाहू महाराजांचे कर्तृत्व वेगळ्या पद्धतीने पर्यटकांसमोर मांडण्याची गरज आहे.

रवी सरदार म्हणाले, अन्य राज्यांतील डोमेस्टिक टूर आॅपरेटर्सना कोल्हापूरची माहिती देणे आवश्यक आहे.यावेळी डॉ. शहाजीराव देशमुख , ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक बाळ पाटणकर, पथिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अरुणा देशपांडे, कर्नाटकचे पर्यटन सल्लागार डॉ. अमर आडके, ॠतुराज इंगळे, अमरजा निंबाळकर, पल्लवी कोरगांवकर, सूजय पित्रे, समीर देशपांडे, शंकरराव यमगेकर, तृप्ती पुरेकर, अमित हुक्केरीकर, प्राची देशपांडे, सागर पाटील, विनय दबडे, केदार गयावळ यांनी पर्यटनाशी निगडित मुद्द्यांची मांडणी केली.लवकरच कोल्हापूरची पर्यटन पुस्तिका, नकाशापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गप्रमाणेच कोल्हापूरची पर्यटन पुस्तिका आणि पर्यटन नकाशा लवकरच माहिती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी चर्चासत्राचे अध्यक्ष माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी सांगितले.चर्चासत्रातील सूचनापुण्याहून येताना कोल्हापुरात नेमके आता कुठे वळायचे कळत नाही, फलक उभारावेत.मर्दानी खेळांचे नेहमी पर्यटकांना दर्शन घडवावे.मसाई पठारावर ‘इको गार्डन’ करावे.जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर माहिती फलक लावावेत.प्रशिक्षित गाईडस्ची उपलब्धता आवश्यक.चित्रीकरणासाठी स्थळांचा विकास केला जावा.