शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांच्या प्रेम, विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:04 IST

कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.

ठळक मुद्दे कोल्हापूरकरांच्या प्रेम,विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदारअनेक प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान

कोल्हापूर : कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक दौलत देसाई यांची शुक्रवारी(दि.८) यांची बदली झाली. परंतु अद्याप जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बदलीची पदस्थापना मिळालेली नाही. चार दिवसात ती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधताना कोल्हापूरातील कारकिर्दीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, कोल्हापूरकरांनी आपल्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या पाठबळामुळे व शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी, तहसिलदार कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांच्याकडून उत्साहाने व चांगले काम झाले. त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. कुटूंबप्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर भर देऊन गेल्या दोन वर्षात काम केले. लोकांना आठवणीत राहील अशीच कामाची पध्दत राहीली.ते पुढे म्हणाले, येथील कारकिर्दीत कोल्हापूरकरांच्या प्रेम आणि विश्वासामुळे अनेक प्रश्न मार्गी लावता आले. या कालावधित कोणताही प्रश्न चिघळू न देता संवादाने तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पुजारी, झिरो पेंडंसी, आॅनलाईन सातबाराचे काम, रेशन डिजिटलायझेशनमध्ये राज्यात अव्वलस्थान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित होणाऱ्या लोकांच्या शंकांचे निरसन करून योग्य मोबदल्यात त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याचे काम, माजी सैनिकांच्या विधवांना जमिनीचे वाटप, आणिबाणीतील सत्याग्रहींना पेन्शन मंजूर, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला. 

 मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी दिल्या असे विविध प्रश्न मार्गी लावल्याचे मनस्वी समाधान आहे. जिल्हा नियोजन समितीमधील निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांवर शंभर टक्के खर्च होईल या दृष्टीनेही प्रयत्न राहीला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर