शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

कोल्हापूरकरही उद्याच्या ‌भारत बंदमध्ये रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:39 IST

Framar, Kolhapurnews केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्याच्या विरोधात उद्या, मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील सर्व संघटना, व्यापारी संस्था, राजकीय पक्षही सहभागी होणार असून, बंद कडकडीत पाळला जाणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरही उद्याच्या ‌भारत बंदमध्ये रस्त्यावर काँग्रेससह डाव्या आघाडी, कामगार संघटनाही उतरणार

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्याच्या विरोधात उद्या, मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील सर्व संघटना, व्यापारी संस्था, राजकीय पक्षही सहभागी होणार असून, बंद कडकडीत पाळला जाणार आहे.

याबाबत सर्व राजकीय पक्ष, संस्था, कामगार संघटना, व्यापारी संस्था, शेतकरी संघटनांची शेतकरी कामगार पक्षाच्या टेंबे रोडवरील कार्यालयात बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार होते.या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सर्वजण बिंदू चौकात मंगळवारी सकाळी दहा वाजता जमणार असून, ठिय्या आंदोलन, मोटारसायकल रॅली, शहरात फिरून बंदचे आवाहन केले जाणार आहे.या आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, सर्वपक्षीय नागरी कृती समिती, कॉमन मॅन संघटना, किरकोळ दुकानदार असोसिएशन, रेशन दुकानदार संघटना, सराफ असोसिएशन, मार्केट कमिटी, हमाल संघटना, लाल बावटा कामगार संघटना, ऊसतोडणी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, फेरीवाले संघटना, आदींनी पाठिंबा दिला आहे.

गडहिंग्लज इचलकरंजी, शिरोळ, वडगांव, गारगोटी, आदी तालुके व बाजारपेठाही या दिवशी बंद ठेवल्या जाणार आहेत. या बैठकीत निमंत्रक नामदेव गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, किसान सभेचे नेते उदय नारकर, जनता दलाचे रवी जाधव, सर्व श्रमिकचे अतुल दिघे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, बाबासाहेब देवकर, वैभव कांबळे, अमोल निकम, प्राचार्य टी. एस. पाटील, वाय. एन.पाटील, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, शिवाजी मगदूम, अजित पोवार, संभाजी जगदाळे, कुमार जाधव, अमोल नाईक, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर