शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज

By admin | Updated: September 4, 2016 01:27 IST

गर्दीने बाजारपेठा फुलल्या : मंडळांच्या मिरवणुकांनी गणेशोत्सवाचा रंग भरू लागला

कोल्हापूर : सुखकर्ता, बुद्धिदाता गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या आगमनाला आता काही तासच शिल्लक राहिल्याने आराशीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याने शहरातील सगळे रस्ते गर्दीने फुलले आहेत. घरोघरी आराशीची मांडणी, तर मंडळांच्या मांडवांमध्ये मिरवणुकांच्या लगबगीने शहरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहाने भारलेले झाले आहे. उत्सवादिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बहुतांश मंडळांनी शनिवारीच गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. उद्या, सोमवारी गणेशचतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे; पण उत्सवाची सुरुवात आज, रविवारी हरितालिका पूजनाने होणार आहे. शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने मिळालेला संध्याकाळचा वेळ सत्कारणी लावत नागरिकांनी आराशीची खरेदी आटोपून घेतली. घराघरांत आराशीच्या तयारीची लगबग सुरू होती. दुसरीकडे, मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती आगमनाची मिरवणूक, मांडवाच्या सजावटीसाठी रात्रभर राबत आहेत. गणेशचतुर्थीदिवशी कुंभार गल्लीमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी असते. ती टाळण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच नागरिक गणेशमूर्ती घेऊन जात आहेत. विशेषत: प्राथमिक शाळा, विविध संस्था, कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने शनिवारीच गणेशमूर्ती नेण्याला प्राधान्य दिले गेले. चारचाकी, दुचाकी गाड्यांवरून गणेशमूर्ती नेणारे नागरिक दिसत होते. बहुतांश मंडळांनीही गर्दी टाळत गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. महाद्वार, पापाची तिकटी हाऊसफुल्लशहराचा मध्यवर्ती परिसर आणि मुख्य बाजारपेठ असलेला महाद्वार रोड आणि पापाची तिकटी हा परिसर गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. सणासाठी नवनवीन कपडे, गौरीचे अलंकार यांच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू होती; तर पापाची तिकटी, गंगावेश परिसर म्हणजे गणेशमूर्ती घडविणाऱ्या कुंभार बांधवांचा परिसर. येथेच झुरमुळ्या, तोरण, रेशमी पडदे, धूप, अगरबत्ती, फटाके, फुलांच्या कमानी, प्लास्टिकची फुलं, गौरी-शंकरोबाच्या मांडणीसाठी स्टॅँड, हार, माळा, किरीट, गणपतीच्या हातातील आयुधं अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे रहदारी खोळंबली.शनिवारी संध्याकाळी शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाची २१ फुटी गणेशमूर्तीची मिरवणूक येत होती. मात्र, मध्यवर्ती बसस्थानकासमोर मिरवणूक आल्यानंतर विद्युत तारांमुळे गणेशमूर्ती पुढे नेता येईना. तारा उचलण्याची काठी लहान पडत होती. मागे रहदारी खोळंबली. ही परिस्थिती पाहून मुस्लिम बांधव राजू मणेर यांनी आपल्या गाडीमागील साहित्याला बांधलेली दोरी तोडली. त्या लहान काठीला आणखी एक काठी बांधली आणि तारा उचलण्यास मदत केलीघरोघरी आरासाची मांडणी शनिवार-रविवार हे दोन दिवस गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मिळाल्याने प्रत्येक घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे कुटुंबीय एकत्र येऊन आराशीची मांडणी करीत आहेत. झुरमुळ्या, विद्युतदिव्यांच्या माळा, फुलांच्या माळांनी घराची सजावट सुरू आहे. त्यामुळे वातावरण भारले आहे.स्वागत कमानी, विद्युत रोषणाईआगमनाची लगीनघाई सुरू होती. मांडव उभारणीनंतर प्रत्येक गल्ली, पेठेबाहेर स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील देखावे हे कोल्हापूरचे विशेष आकर्षण असते आणि हा देखावा काही दिवस तरी गुलदस्त्यात ठेवत मंडळाचे कार्यकर्ते देखाव्याच्या तयारीत गुंतले आहेत.