शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकता,अखंडतेचा संदेश देत धावले कोल्हापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:08 IST

कोल्हापूर  : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देत राष्ट्रीय एकता दौडीच्या निमित्ताने कोल्हापूरकर आज धावले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल ...

ठळक मुद्देराष्ट्रीय एकता,अखंडतेचा संदेश देत धावले कोल्हापूरकरलोहपुरूषांचे एकतेचे कार्य प्रेरणादायी  : डॉ. देशमुख

कोल्हापूर : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देत राष्ट्रीय एकता दौडीच्या निमित्ताने कोल्हापूरकर आज धावले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकतेचे कार्य नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी केले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ 31 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होत आहे. आज कोल्हापुरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त्‍ रन फॉर युनिटी एकता दौड काढण्यात आली. या एकता दौडीचा शुभारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करुन तसेच हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथही घेण्यात आली.दसरा चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके यांच्या हस्ते पुषपहार अर्पण करुन या एकता दौडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद संकपाळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णा पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस जवान, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, खेळाडू तसेच क्रीडा प्रेमी जनता उपस्थित होती.दसरा चौकातून सुरु झालेली ही एकता दौड पुढे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, वाणिज्य महाविद्यालय, टेंभे रस्ता, केशवराव भोसले नाट्यगृह, प्रायव्हेट हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येऊन या एकता दौडीचा समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात या दौडीत देण्यात आला.

या एकता दौडीमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी आणि राष्ट्रीय धावपटू स्मिता माने यांचा प्रमुख सहभाग तसेच पोलीस बँड हे या दौडीचे मुख्य आकर्षण होते. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगण्यात आली. तसेच राष्ट्रगीतांने या दौडीचा समारोप करण्यात आला.लोहपुरूषांचे कार्य प्रेरणादायी  : डॉ. देशमुखया प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकता, एकात्मता आणि अखंडतेचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. देशात भौगोलिक ऐक्य आणि एकसंघता साधण्याचे ऐतिहासिक काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात पोलीस संचलन आयोजित करून एकतेचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.या प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भारत देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. अशा या भारताच्या लोहपुरुषाचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. प्रारंभी तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर