शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

कोल्हापूरकर गारठले

By admin | Updated: December 19, 2014 23:24 IST

१५ डिग्री सेल्सिअस तापमान : थंडीचा महिना, तब्बेत सांभाळा

कोल्हापूर : गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली असून, अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्याने पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. या थंडीमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर परिणाम झाला आहे. सकाळी व रात्रीचे तापमान १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. आठ दिवसाला बदलणाऱ्या हवामानाचा विशेषत: वयोवृद्ध नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आला. त्यानंतर थंडी असे विचित्र हवामानाचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. गेले दोन दिवस थंड व कोरडे वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे वातावरणात दिवसभर कमालीचा गारवा जाणवतो. या थंडीचा परिणाम शाळा, कॉलेजवर झालेला दिसतो. थंडीतून कुडकुडतच मुलांना शाळेत जावे लागत असल्याने उपस्थितीवर परिणाम दिसत आहे. सकाळी लवकर घराबाहेर कामानिमित्त जावे लागणारे स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालूनच बाहेर पडावे लागते. ग्रामीण भागात सध्या साखर व गुऱ्हाळघरांचा हंगाम सुरू आहे. पहाटे साडेचार-पाच वाजताच ग्रामीण भाग जागा होतो. तेथून पुढे त्यांचा दिनक्रम सुरू होतो. त्यावर थंडीचा परिणाम झाला आहे. रात्रभर कोरडे वारे वाहत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होते. सकाळी नऊ वाजले तरी अंग गारठवणारी थंडी असते. ऊन असते, पण अंगातून गारठा जात नाही. सकाळी दहा वाजता दुचाकीवरुन कामावर जातानाही अंग ऊबदार कपड्यांनी झाकूनच बाहेर पडावे लागते. दिवसभर गारठा जाणवतोच, सायंकाळी सहानंतर हळूहळू थंडी जाणवू लागते. रात्री आठनंतर तर ती अधिक त्रासदायक ठरते. (प्रतिनिधी)हवामानात आठवड्याला बदल होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. तापमानाचा पारा घसरल्याने आरोग्याची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे सर्दीसह घशाचे विकार उद्भवत असल्याने वयोवृद्ध व लहान मुलांची काळजी घ्यावी. -डॉ. वैशाली कुलकर्णीथंडीचे परिणामसर्दी, घशांचे विकारपन्नास वर्षे पूर्ण झालेल्यांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. थंडीत उघड्यावर झोपलो तर अर्धांगवायू होण्याची शक्यताकाय करावेकोमट पाणी प्यावेगरम ऊबदार कपडे घालावेतथंड पदार्थ खाणे टाळावेततीळ, गूळ असे पदार्थ खावेत