शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी भुकेल्यांना घास..‘कोल्हापुरी पॅटर्न’च आहे खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 12:24 IST

कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : सण-उत्सव असो की, वाढदिवस उत्साह आणि धडाक्यात साजरा करणे कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीचा विचार करून कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे. सीपीआर चौकात सुरू असलेल्या कोल्हापूर थाळी उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांत १५०० जणांनी वाढदिनी अन्नदान केल्याने अनेकांची भूक भागली आहे. सीपीआर रूग्णालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना एकवेळचे जेवण मिळत नाही. त्यांची जेवणाअभावी अडचण होत असल्याचे उत्तरेश्वरपेठेतील सामाजिक कार्यकर्ते आणि चांदी व्यावसायिक उदय प्रभावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी अशा नागरिकांसाठी सीपीआर चौकात ‘कोल्हापूर थाळी’ या उपक्रमांतर्गत गेल्यावर्षी जूनपासून मोफत जेवण सुरू केले. येथे दुपारी साडेबारा वाजता तीनशे जणांना जेवण दिले जाते. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या नानबान फाउंडेशनची त्यांना मदत होत आहे. अनेकजण त्यांचा आणि कुटुंबातील अन्य सदस्य, मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस, एखाद्याच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘कोल्हापूर थाळी’ला अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत देणगी देत ‘कोल्हापूर थाळी’मध्ये सहभागी होत आहेत. महिन्यागणिक त्यांची संख्या वाढत आहे. भुकेल्यांना घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा एखाद्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ अनुकरणीय आहे.

अशी आहे ‘कोल्हापूर थाळी’एक चपाती, एक वाटी भाजी, आमटी, लागेल तितका भात, गोड पदार्थ (बासुंदी, फ्रुटखंड, जिलेबी, शेवयाची खीर यापैकी)उपक्रमाची व्याप्ती वाढविणारगेल्या आठ महिन्यांपासून रोज तीनशे जणांना मोफत जेवण पुरविण्याचा उपक्रम अखंडपणे राबवित आहे. त्यात सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांचे अधिक प्रमाण आहे. रोज जेवण देण्याचा किमान दहा हजार रुपये खर्च येतो. वाढदिवस, पुण्यस्मरणानिमित्त आपल्या परीने काहीजण आर्थिक मदत देतात. त्यातून खर्च भागविला जात आहे. आर्थिक ताकद वाढल्यास ‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाची व्याप्ती वाढविणार आहे.मिरजकर तिकटी, रंकाळा तलाव येथे उपक्रम सुरू करणार असल्याचे उदय प्रभावळे यांनी शुक्रवारी सांगितले. अन्नदान करण्याची इच्छा, तयारी असणाऱ्या नागरिकांनी ‘कोल्हापुरी थाळी’च्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

७३ हजार जणांना अन्नदान

या ‘कोल्हापूर थाळी’ उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांमध्ये रोज किमान ३०० याप्रमाणे आतापर्यंत एकूण ७३ हजार ५०० जणांना अन्नदान करून त्यांचे पोट भरण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रभावळे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर