शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रियामध्ये कोल्हापुरी ‘आयर्नमॅन’चा ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:06 IST

कोल्हापूर : केलगनफर्ट (आॅस्ट्रिया) येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने १२ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन या खेळाडूंनी यश मिळवीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला.शारीरिक ...

कोल्हापूर : केलगनफर्ट (आॅस्ट्रिया) येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने १२ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन या खेळाडूंनी यश मिळवीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला.शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करून ‘आयर्नमॅन’चा किताब पटकविला. त्यामध्ये (कंसात स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केल्याची वेळ) : आदित्य शिंदे (१० तास ५२ मिनिटे ४५ सेकंद), रौनक पाटील (१४:४: २०), आशिष तंबाके (१४:४:८), डॉ. प्रदीप पाटील (१५:३२:२६), स्वप्निल माने (१४:४८:५८), उदय पाटील (१५:३३:५), डॉ. संदेश बागडी (१५:२९:२१), डॉ. विजय कुलकर्णी (१५:३१:४३), विनोद चंदवाणी (१५:३२:२६), महेश मेटे, विशाल कोथळे (१५:५८:४५), चेतन चव्हाण, सत्यवान ननावरे, बलराज पाटील यांचा समावेश आहे. ‘आयर्न किड’ ही स्पर्धा १५ वर्षांखालील गटासाठी झाली. त्यात वरद पाटील आणि नीरव चंदवाणी यांनी १०० मीटर जलतरण, २.२ किलोमीटर अंतर २० मिनिटांमध्ये धावणे हे पूर्ण करून अनुक्रमे चौथा आणि बारावा क्रमांक मिळवून बाजी मारली. विजेते स्पर्धक कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे सदस्य आहेत. स्वप्नील माने, महेश मेटे, विशाल कोथळे हे ‘आय एम फिट’ क्लबचे सदस्य असून महेश शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.वर्षभरातील तयारीच्या जोरावर यश‘आयर्नमॅन’साठी या खेळाडूंनीगेल्या वर्षी जुलैमध्ये नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी सराव सुरू केला. राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत धावणे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अश्विन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली; तर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी वैभव बेळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग, तसेच संध्याकाळी पाच ते सात या वेळेत सागर पाटील जलतरण तलाव येथे नीळकंठ आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जलतरणाची तयारी केली. त्यासह दर रविवारी कोल्हापूर ते हत्तरगी, निपाणी-संकेश्वर असे १२० ते १५० किलोमीटर सायकलिंग ते करीत होते. या तयारीच्या जोरावर ‘आयर्नमॅन’ किताबावर या खेळाडूंनी नाव कोरले.खेळाडूंचा लागला कसयावर्षी ‘आयर्नमॅन आॅस्ट्रिया’मध्ये जगभरातील विविध ५० देशांतील ३००० स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धकांचा थंड पाण्यामध्ये ३.८ किलोमीटर जलतरण, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग हे १७ तासांमध्ये पूर्ण करताना कस लागला.