शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पन्हाळ्याची ऋचिका खोत महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत ठरली उपविजेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:40 IST

: लोकप्रिय मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत पन्हाळ्याची ऋचिका खोत कोल्हापुरी बाज राखत उपविजेती ठरली. निवडक १३ स्पर्धकांमधून निवडलेली ऋचिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. महाअंतिम सोहळ्याचा निकाल गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देरसिकांच्या कौतुकास पात्र : राखला कोल्हापुरी बाजमहाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत ठरली उपविजेती 

संदीप आडनाईक

कोल्हापूर : लोकप्रिय मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत पन्हाळ्याची ऋचिका खोत कोल्हापुरी बाज राखत उपविजेती ठरली. निवडक १३ स्पर्धकांमधून निवडलेली ऋचिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. महाअंतिम सोहळ्याचा निकाल गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला.ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्याशा गावातील ऋचिका खोतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरातून केली. शेतकरी वडील असलेल्या राजेश खोत यांनी ऋचिकाला सर्व प्रकारची मदत केली. प्रसंगी शेतीचा तुकडा विकून तिला अभिनयाच्या क्षेत्रात उभे राहण्यास मदत केली. पन्हाळ्यावरील हायस्कूलमधील शिक्षण तिने गावातून चालत जाऊन पूर्ण केले.सन २०१३ मध्ये ऋचिका विवेकानंद महाविद्यालयातील वाणीकौशल्य अभ्यासक्रमात सहभागी झाली. हिमांशू स्मार्त यांनी तिला घडविले. त्यापूर्वी तिने एनएसएस, लघुनाट्ये, पथनाट्ये, कॉलेजच्या मासिकात लिखाण केले होते.

कॉलेजतर्फे शैशवताराचा प्रयोग केला. वाणीच्या नाटकांमधून सर्जनशाळेची बीजे रुजली. ऋचिका मराठी साहित्याची पदवीधर आहे. दोन वर्षांनंतर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सर्जनशाळामार्फत ट्रिपल सीट हे पूर्ण लांबीचे नाटक केले. त्यानंतर पुण्याला ललितकला केंद्रात तिने प्रशिक्षण घेतले. नंतर गीतांजली कुलकर्णी यांच्या गोष्टरंगमध्ये तिने लहान मुलांसाठीच्या थिएटरचे शिक्षण घेतले.सर्जनशाळेसोबत उडला माझा टॉक-टाइम नावाच्या विक्षिप्त कॉमेडीमधे तिने वेगळ्या धाटणीची भूमिका केली. चं. प्र. देशपांडे यांची वेषांतर, सतीश तांदळेसोबत सादर केली. ती भालजी पेंढारकर केंद्राच्या विद्यार्थ्यांची आणि सर्जनशाळेतील मुलांची शिबिरे घेत असते. सर्जनशाळेच्या विभावमध्ये तिने अरुण खोपकर यांच्या ललितलेखांचे अभिवाचन केले. त्याचे बेळगाव, सांगलीमध्ये प्रयोग केले.ऋचिकाने आदिकाळोखसारख्या अभिवाचनासाठी संगीत संयोजन केलं. अघोर आणि 'कल्लुरीचा रेडिओ' या सर्जनशाळेच्या नाटकांमधील गाण्यांना चाली दिल्या आणि तरल संवेदनशीलता आणि प्रवाही शैली लाभलेली लेखिका म्हणूनही तिने नाव मिळविले. या स्पर्धेचे परीक्षक संजय जाधव आणि मकरंद देशपांडे तसेच सूत्रसंचालक यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर