शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद सभागृहासाठी आणखी १ कोटी उधळणार, माहिती अधिकारात उघड 

By भीमगोंड देसाई | Updated: June 18, 2024 16:17 IST

नूतनीकरणाच्या नावाखाली खाबुगिरी, वरिष्ठांचे सोयीस्कर दुर्लक्ष

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्हा परिषद सभागृह देखभाल, दुरुस्ती, नूतनीकरणावर २०१४ ते मे २०२४ अखेर तब्बल १ कोटी ५४ लाख ९३ हजार ४७६ रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय अजून नूतनीकरणावर आणखी १ कोटी ६ लाख १६ हजार ९५९ रुपये उधळण्यात येणार आहेत. यासह एकूण २ कोटी ६१ लाख १० हजार ४३५ रुपये खर्च होणार आहेत. परिणामी नवीन सभागृह बांधून पुन्हा शिल्लक राहील इतकी रक्कम आतापर्यंत केवळ नूतनीकरण आणि दुरुस्तीवर उधळण्यात आली आहे.‘लोकमत’ने माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीतून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या खर्चाकडे तत्कालीन आणि आताचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. यामुळे नूतनीकरणाच्या नावाखाली खाबुगिरी होत असल्यानेच त्याला चाप लावण्याचे धाडस कोणीही करीत नसल्याचा आरोप होत आहे.जिल्हा परिषदेत सदस्यांसाठी राजर्षी शाहू छत्रपती सभागृहाचे बांधकाम सन १९९६ मध्ये झाले. त्यानंतर प्रशासनाने वेळोवेळी सभागृहाच्या देखभाल, दुरुस्तीवर खर्च केले आहे; पण नूतनीकरणाच्या नावाखाली सर्वाधिक खर्चाचा सपाटा २०१४ पासून लावला आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नूतनीकरण केल्याने हे काम त्यावेळी वादग्रस्त ठरले. २०१४ मध्ये विधानसभेची आचारसंहिता असताना नूतनीकरणावर निधी उधळला.त्यानंतर पुन्हा आता सदस्य नसतानाही नूतनीकरण केले जात आहे. यासाठी आतापर्यंत ८३ लाख ८३ हजार ४१ रुपये खर्च केले आहेत. आणखी १ कोटी ६ लाख १६ हजार ९५६ रुपये खर्च करण्याचा डाव आहे. सध्या प्रत्यक्षात दिलेल्या निधी इतके काम झालेले नाही. तरीही अधिकारी एकमेकांना वाचवताना दिसत आहेत. परिणामी नूतनीकरणाचा खर्च वादग्रस्त ठरला आहे.

कोणत्या वर्षी किती खर्च

  • २०१४-१५ : ११ लाख ३१ हजार ४७०
  • २०१५-१६: ५९ लाख ७८ हजार ९६५
  • २०२३- २४ : ८३ लाख ८३ हजार ४१

सन २०१४ पर्यंतची माहिती गायबबांधकाम विभागातील बेधुंद कामकाजामुळे जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सभागृह बांधल्यापासून देखभाल, दुरुस्ती, नूतनीकरणावर झालेल्या खर्चाची माहिती बांधकाम विभागाकडे मागितल्यानंतर केवळ २०१४ ते मे २०२४ अखेरपर्यंतचीच माहिती त्यांनी दिली आहे. यावरून १९९६ ते २०१४ पर्यंतच्या खर्चाची माहिती बांधकाम विभागातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद