शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून जरगनगर येथे तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:03 IST

जुन्या भांडणाच्या कारणावरुन जरगनगर -पाचगांव रस्त्यावर रिव्हॉल्वरमधून तरुणावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली. प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे.

ठळक मुद्देरिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून जरगनगर येथे तरुणाचा खूनजुन्या भांडणाचा वाद : संशयिताचा शोध सुरु

कोल्हापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरुन जरगनगर -पाचगांव रस्त्यावर रिव्हॉल्वरमधून तरुणावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली. प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे.

याप्रकरणी संशयित प्रतिक सुहास सरनाईक (रा. साईनगर, पाचगांव ) याचा शोध करवीर पोलिस घेत आहेत. याबाबतची फिर्याद गौरव सतीश वडेर (रा. हरिपार्क गल्ली, नं-१ आर.के.नगर रोड, पाचगांव) यांनी दिली. त्याप्रमाणे प्रतिक सरनाईकवर खुनाचा गुन्हा, अपहरण, धमकी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रतिक सरनाईकवर यापूर्वीही इचलकरंजी येथे काही गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात जुन्या भांडणाच्या कारणावरुन वादातून हा खून झाला असला तरी तो नेमका कोणत्या कारणासाठी झाला, या दृष्टिने पोलिस तपास करीत आहेत.

प्रतिक सरनाईकयाबाबत पोलिसांनी सांंगितले की, जरगनगर ते पाचगांव मुख्य रस्त्यावर शुभम राजेश पवार व गौरव सतीश वडेर हे दोघेजण रविवारी रात्री बोलत उभे होते. प्रतिक सरनाईक हा त्यांच्याजवळ आला व या दोघांना शिवीगाळ करु लागला. प्रतिक सरनाईकची समजूत घालत असताना प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार व सागर कांबळे हे दोघेजण त्यांच्याजवळ आले.

यावेळी सरनाईकने सागरची गळपट्टी धरुन त्यास शिवीगाळ केली. प्रतिक पोवारने सरनाईकला अडविले. ‘सागर माझ्यासोबत आला आहे, त्याला शिवीगाळ करु नकोस, तु त्याची गळपट्टी सोड ’. प्रतिक पोवार सरनाईकला समजावत होता, तरीही,सरनाईक पुन्हा त्याला शिवीगाळ करु लागला. या रागातून प्रतिक पोवारने सरनाईकची गळपट्टी धरली. त्यावेळी या दोघांची भांडणे गौरव वडेर आणि शुभम पवारने सोडविली.‘मी लघुशंकेला जाऊ काय असे सरनाईकने विचारल्यावर गौरवने त्यास जाऊन ये असे सांगितले. सरनाईक लघुशंकेला जाऊन त्यांच्याजवळ आला. त्याने कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून त्याने थेट प्रतिक पोवारच्या डोक्यात गोळया झाडल्या. शुभम आणि गौरववर रिव्हॉल्वर रोखले. ‘तुम्ही येथून निघून जावा, नाहीतर तुम्हालाही गोळी घालून अशी धमकी त्याने दिली. सागर कांबळे यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून माझ्या दुचाकीवर बस असे म्हणत दुचाकीवरुन घेऊन निघुन गेला.दरम्यान, हा प्रकार समजताच घटनास्थळी करवीर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव,पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करुन प्रतिक पोवारचा मृतदेह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मध्ये नेला. ही घटना समजताच जरगनगर परिसरातील नागरिकांनी आणि प्रतिक पोवारच्या मित्रांनी सीपीआरमध्ये रात्री गर्दी केली होती.जरगनगरमध्ये शांतता, पोलिस बंदोबस्त...जरगनगर-आर.के.नगरकडे रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रतिक पोवारचा खून झाल्याचे समजताच सोमवारी दिवसभर या परिसरात शांतता होती.वाद सागरसोबत, खून त्याच्या मित्राचासंशयित प्रतिक सरनाईकचा सागर कांबळे याच्याशी जुने भांडण होते. यावेळी सरनाईकने सागरला शिवीगाळ केली आणि त्याची गळपट्टी धरली. सागरसोबत तेथे आलेला त्याचा मित्र प्रतिक पोवारने सरनाईकला अडविले. तो ऐकत नसल्याचे पाहून प्रतिकने सरनाईकची गळपट्टी धरली. ती भांडणे गौरव वडेर आणि शुभम पवारने सोडविली. परंतु थोड्याच वेळात सरनाईकने लपवून ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेउन येत प्रतिकच्या डोक्यात गोळी घातली. सागरसोबतच्या वादात पडल्याने त्याचा मित्र प्रतिकचा हकनाक बळी गेला आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखून