शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा ‘सिनेमॅन’ सातासमुद्रापार, स्पेनच्या चित्रपट महोत्सवात मिळाली तीन नामांकने

By संदीप आडनाईक | Updated: May 28, 2025 13:01 IST

उत्कृष्ट चित्रपटासह किशोर कदम, ऋषिकेश कुलकर्णी यांचा समावेश

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापुरातील युवा दिग्दर्शक उमेश बगाडे यांच्या ‘सिनेमॅन’ चित्रपटाला स्पेनच्या माद्रीद येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन नामांकने मिळाली आहेत. उत्कृष्ट चित्रपटासह अभिनेता किशोर कदम यांना उत्कृष्ट अभिनेता आणि ऋषिकेश कुलकर्णी यांना उत्कृष्ट संगीतासाठी नामांकन मिळालेले आहे.कोल्हापुरातील युवा दिग्दर्शक उमेश बगाडे याने चिल्लर पार्टीचे संस्थापक मिलिंद यादव यांच्यावर आधारित ‘सिनेमॅन’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चतुरस्त्र अभिनेता किशोर कदम यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, सिद्धार्थ बेदी, रिचर्ड केविन, रिकी वूड यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.गतवर्षी कोलकाता येथील चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली होती. आता १ ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्पेनच्या माद्रीद येथे होणाऱ्या इमॅजिन इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी उत्कृष्ट मानवतावादी चित्रपट म्हणून जीवनगौरव पुरस्कार, किशोर कदम यांना उत्कृष्ट अभिनेता, आणि ऋषिकेश कुलकर्णी यांना उत्कृष्ट संगीतासाठी नामांकन मिळालेले आहे.

लघुपटानंतर चित्रपटासाठी धाडसटीव्ही, लघुपट आणि माहितीपटांचा ७ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या बगाडे यांच्या ‘चौकट’ लघुपटाची २०१६ मध्ये भारतीय पॅनोरमासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली होती. त्यांच्या ‘अनाहुत’ या लघुपटाने २०१८ मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कार जिंकला. हे दोन्ही लघुपट प्रतिष्ठेच्या जागतिक महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. आता त्यांनी पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे.

या चित्रपटासाठी कोल्हापुरातील तंत्रज्ञांनी मेहनत घेतलेली आहे. या चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण कोल्हापुरात तर उर्वरित चित्रिकरण लंडनमध्ये झाले आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीपासून ते त्याच्या कलात्मक भावनेपर्यंत, कोल्हापूर हे नेहमीच सिनेमाचा श्वास घेणारे शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कोल्हापूरचे नाव घेतले जात आहे, याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. -उमेश बगाडे, दिग्दर्शक, सिनेमॅन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर