शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:25 IST

कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटीलअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पद

कोल्हापूर : शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.छत्रपती शाहू स्टेडियम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा सकाळी ९.१५ वाजता त्यांच्या हस्ते झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राधिकरणाचे काम हे कसबा बावडा येथील प्रशासकिय इमारत येथील कार्यालयातून सुरु होणार आहे. या प्राधिकरणामुळे शहरा लगतच्या गावांसह उपनगरांचा विकास होईल.

प्रस्तावित हद्दवाढीतील गावांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून एका नियमावलीत ही गावे आल्याने त्यांचा चांगल्या प्रकारे व व्यवस्थित विकास या प्राधिकरणातून होणार आहे. शहरामध्ये अनेक गोष्टी ज्या महापालिकेच्या सध्याच्या उत्पन्नात करता येत नाहीत. त्या

मध्ये उपनगरात एखादे चांगले हॉस्पिटल या प्राधिकरणाच्या माध्यमातून करता येईल. या ठिकाणी चांगले व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा प्राधिकरणचा मनोदय आहे. त्याचबरोबर एक आॅडीटोरियमही उभारले जाईल. अशा गोष्टींच्या सुविधांमुळे उपनगरातील लोकांना भवानी मंडपात यावे लागणार नाही.ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तयार झालेल्या भारतीय राज्य घटनेमुळे पुरुष व स्त्रियांना एकाच मताचा अधिकार मिळून समानता आली. त्याचबरोबर प्रत्येकाला स्वत:चे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. आपल्या हक्कांसाठी आपण जितके जागरुक असतो. तसे दुसऱ्यांच्या हक्कासाठीही जागरुक असले पाहीजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे प्र्रत्येकाला दिले आहे.त्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये आपण बरबाद तर करत नाही ना याचेही भान प्रत्येकाने ठेवावे.

३१ मार्चपर्यंत शिल्लक वाड्यावस्त्यांवर वीज मिळणारजिल्ह्यातील एकही वाडी वस्ती वीजेपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तीन ते चार वाड्या सोडल्या तर सर्वत्र वीज पोहोचली आहे. या ठिकाणी वीज द्यावी, ती शक्य नसल्यास सोलरच्या माध्यमातून वीज पुरवावी, ३१ मार्चपर्यंत शिल्लक राहील्या वाड्यांवर कोणत्याही परिस्थितीत वीज द्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पदजिल्ह्यातील धनगरवाड्यातील मुलांना कोल्हापूर व कोल्हापूरची वैशिष्टये दाखविण्यासाठी सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम गौरवास्पद आहे. विकासापासून मागे राहीलेल्या समाजाला विकासाची तोंड ओळख करुन देणे आवश्यक असून ते पाटील यांच्या प्रयत्नातून होत आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८