शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कोल्हापूर टोलमुक्त करणारच

By admin | Updated: November 22, 2014 00:28 IST

चंद्रकांतदादा पाटील : सरकार सकारात्मक; कायदा कुणीही हातात घेऊ नये

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ‘टोल’बाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘कोल्हापूर टोलमुक्त करणारच’, त्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी ग्वाही सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, टोल या विषयात सरकारने माघार घेतलेली नाही. चळवळीतून मोठे झालेलो आम्ही कार्यकर्ते आहोत. सायन, पनवेल येथील २००० कोटी रुपये किमतीच्या टोल प्रकल्पातील टोलआकारणी रद्दबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्या तुलनेत कोल्हापूरचा प्रकल्पाचा प्रश्न छोटा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन टोल रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सरकारची स्थिती थोडी अस्थिर आहे. दररोज सरकारकडून घेतले जात असलेले तातडीचे निर्णय आणि सरकार स्थिर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे सरकारची धावपळ होत आहे.तरीही यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत दोनवेळा बैठक घेऊन यावर काही मार्ग निघतो का? याबाबत चर्चा झाली आहे. परंतु जो प्रश्न गेल्या पाच वर्षांत सुटला नाही. तो एकाच रात्रीत कसा सुटू शकेल ? यासाठी आणखी थोडा कालावधी लागण्याची शक्यता आहे. टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत.एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जीएसटी आल्यावर एलबीटी आणि जकात पूर्ण संपवू. व्यापाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला कर चालेल पण नवीन पर्याय डोक्यावर आणून बसवू नये. व्यापाऱ्यांनीच हा कर व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचा पर्याय दिला आहे. त्यानुसार हा कर व्हॅटमध्ये जोडता येईल का? याबाबत सरकार विचार करत आहे. कोल्हापूरमध्ये एलबीटी कमी जमा झाला तर अडचण होईल तसेच त्याला पर्यायही दिला नाही तर तेही चालू शकणार नाही. त्यामुळे ना टोल, ना एलबीटी यामधून सरकार मागे गेलेले नाही. त्याला आम्ही तितकेच बांधील आहोत. (प्रतिनिधी)टोलप्रश्नी आज बैठकटोलप्रश्नी उद्या, शनिवारी सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे.