शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गरीबांबद्दल कळवळा का नाही आला?, पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:42 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली ,फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.

ठळक मुद्देगरीबांबद्दल कळवळा का नाही आला?पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. कोल्हापूर श्रीमंत करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.मंगळवारी मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याने त्यावर कारवाई कर नये, असे राज्य सरकारने निर्देश दिल्यामुळे त्याची प्रतिक्रिया महानगरपालिका वर्तुळात उमटली.

या निर्णयाचा कॉँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात निषेध केला आहे. महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बाल कल्याण सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, माजी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांना श्रीमंतांना एक आणि गरीबांना एक न्याय द्यायचा आहे. एकीकडे शहरात गरीबांवर कारवाई झाली त्यावेळी ही मंडळी कुठे होती. त्यावेळी त्यांना कळवळा आला नाही. गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या श्रीमंतांची बाजू घेऊन मताच्या राजकारण करताना मात्र कळवळा आला. नियम न पाळता जर इमारती बांधल्या असतील तर त्यांच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांना संरक्षण देण्याची गरज नाही, अशी अपेक्षा शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केली.येथून पुढे शहरात अतिक्रमण काढण्याची विना परवाना बांधकामे तोडण्याची मोहिम मनपा प्रशासनाने हाती घेतली तर पक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरुन ही कारवाई बंद पाडू असा इशारा देशमुख यांनी दिला. जोपर्यंत गांधीनगर रस्यावरील अवैध बांधकामे तोडली जात नाहीत तोपर्यंत शहरात कारवाई करु दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस संरक्षण नाकारणाऱ्या पोलिस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर