शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:04 IST

कोल्हापूर शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देविसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्जतयारी पूर्ण; चार ठिकाणी वैद्यकीय सुविधा

कोल्हापूर : शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे.‘व्हाईट आर्मी’च्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर (महाद्वार रोड), पापाची तिकटी येथे वैद्यकीय पथकांसह रेस्क्यू टीम असणार आहे. पॉकेट लाईनच्या आधारे मिरवणुकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवले जाईल.

मिरवणूक मार्गावरील व्यवस्था लावण्यासह आपत्ती घडल्यास नियोजनबद्ध आणि प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पीडितांना सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

वैद्यकीय पथकांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, डॉक्टरांची निहा संघटना, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम मेडिको आणि पॅरामेडिको असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी, सभासद डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.

आपत्कालीन वैद्यकीय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिका असणार आहेत. आपत्तीकालीन आणि वैद्यकीय पथकांचे मदतकार्य रविवारी सकाळी दहा ते सोमवारी (दि. २४) सकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

नदीघाटावर आपत्कालीन कक्षपंचगंगा नदीघाटावर विसर्जनावेळी दुर्घटना टाळण्यासाठी व्हाईट आर्मीची यांत्रिक बोट, वॉटर रेस्क्यू टीम तैनात आहे. त्यासाठी आपत्कालीन कक्षही स्थापन केला असल्याचे ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांंगितले.

ते म्हणाले, गेल्या बारा वर्षांचा कोल्हापुरातील सावर्जनिक गणेश विसर्जनाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेऊन, प्रतिवर्षी नियोजनात बदल घडवून कोणतीही वित्त किंवा जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षिततेचा कार्यक्रम आखला आहे. यावर्षी कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रथमोपचार, तात्पुरती वैद्यकीय सेवा देऊन पुढील कार्यवाहीसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याची काळजी घेण्यात येईल. मिरवणूक संपेपर्यंत ‘व्हाईट आर्मी’चे जवान कार्यरत असतील.

महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी करणार मदतया मिरवणुकीत निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, निर्माल्यदानासाठी आवाहन करणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे याबाबत आवाहन केले जाणार आहे. किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत ‘इकोरेंजर्स’ म्हणून शहरातील विविध दहा महाविद्यालयांतील एकूण २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या पंचगंगा नदीघाट, इराणी खण, राजाराम बंधारा येथे गणेश विसर्जनासाठी प्रशासनाला मदत करणार असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर