शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वीज कंपन्यांच्या त्रुटी उद्योजकांच्या माथी का?  : संतोष मंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:13 IST

भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्देवीज कंपन्यांच्या त्रुटी उद्योजकांच्या माथी का?  : संतोष मंडलेवीज दरवाढीला विरोध करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यानंतर भूमिका बदलली

कोल्हापूर : वीज उत्पादित कंपन्यांकडून त्रुटींचा भार ग्राहक, व्यापारी आणि उद्योेजकांवर टाकला जात आहे. यातून होणाऱ्या वीजदरवाढीला उद्योगक्षेत्रातून प्रखरतेने विरोध राहणारच. या आमच्या भूमिकेला भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातर्फे ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या इंडस्ट्रिअल व मशिनरी प्रदर्शनासाठी अध्यक्ष मंडलेचा हे कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.अध्यक्ष मंडलेचा म्हणाले, या वीजदरवाढीला विरोध करण्यासाठी राज्य पातळीवर २० डिसेंबरला बैठक होत आहे. वीज उत्पादन कंपनी दरवाढीसाठी वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव देते. त्यामुळे वीजदरवाढ करताना नियामक आयोग हा वेगवेगळ्या परिस्थितींचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतो. आजचा वीज दरवाढीचा प्रस्ताव हा पाच वर्षांसाठीचा असून, हे धोरण उद्योगक्षेत्राला घातक आहे.

याबाबत वीज नियामक आयोगाने सुनावण्या घेतल्या. त्या सुनावणीवेळी औद्योगिक संघटनांनी वीज दरवाढीला प्रखर विरोध केला आहे. तरीही नियामक आयोग सरकारला हवा तसा निर्णय घेत आहे.चांगल्या दर्जाची वीजसेवा पुरविण्याची जबाबदारी वीज कंपनीची आहे; पण या कंपन्यांकडून त्रुटीचा भार ग्राहक, व्यापारी आणि उद्योजकांवर लादला जात आहे, हे योग्य नाही. विरोधी बाकांवर बसून या पद्धतीने वीजदरवाढ करण्यास भाजपने विरोध दर्शविला होता; पण आज सत्तेवर आल्यानंतर भाजप आपली भूमिका बदलत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या भावना तीव्र आहेत. या वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योजक मेटाकुटीस आले आहेत.

असहकाराचे आंदोलनया वीजदरवाढीबाबत सल्लामसलत करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर उत्सुक आहे. सर्वच मार्ग आंदोलनातून निघत नाहीत. चर्चेतून मार्ग न निघाल्यास असहकाराचे आंदोलन उभारू, असाही इशारा संतोष मंडलेचा यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्यां विविध प्रकारच्या सबसिडींचा भार सरकार उद्योजक, व्यापाऱ्यांवर टाकत असल्याची शंकाही अध्यक्ष मंडले यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर