शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :जलतरण तलावातील पाणी उपसण्यास अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:33 IST

कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील एक जलतरण व डायव्हिंग तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तलाव कोरडे करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तलावाच्या कामास खऱ्या अर्थाने मुहूर्त सापडल्याची भावना जलतरणपटूंकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजलतरण तलावातील पाणी उपसण्यास अखेर मुहूर्तविभागीय क्रीडा संकुल; प्रवेशद्वाराचेही काम सुरू

कोल्हापूर : येथील विभागीय क्रीडा संकुलातील एक जलतरण व डायव्हिंग तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तलाव कोरडे करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तलावाच्या कामास खऱ्या अर्थाने मुहूर्त सापडल्याची भावना जलतरणपटूंकडून व्यक्त होत आहे.विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामास सन २००९ पासून सुरुवात झाली. त्यात धावनमार्ग, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल, टेनिस, कबड्डी, खो-खो आदी मैदाने तयार झाली. मात्र, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव कैद्यांच्या शेतातून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे तयार होऊन सुरू झाले नाहीत. सर्व प्रयत्नांअंती त्यात सांडपाणी मिसळू लागल्याने ते दुरूस्त करावे की अन्यत्र बांधावे. याबाबत गेल्या तीन वर्षांत मोठा खल झाला.

अखेरीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर सर्व यंत्रणा कामास लागल्या. त्यातून आयआयटीच्या तज्ज्ञांना ‘पाणी नेमके कुठे मुरते’ याचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्याचे ठरविले. मात्र, पावसामुळे या कामास पुन्हा ‘खो’ लागला. मागील आठवड्यातही तलावातील पाणी काढण्याचे काम सुरू झाले.

पुन्हा पावसाने अचानक हजेरी लावली. त्यात पुन्हा तलावात पाणी भरले. पुन्हा शनिवार(दि. २०)पासून पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात दोन मोटारपंप लावण्यात आले आहेत. पाणी उपसण्याची प्रक्रिया धिम्या गतीने होत असल्याने या दोन पंपांद्वारे तत्काळ पाणी उचलले जात नाही. त्यामुळे मोठ्या अश्वशक्तीच्या मोटारपंपाची गरज या दोन्ही तलावांच्या ठिकाणी आहे. तरच येत्या आठवडाभरात हजारो लिटरचे हे तलाव मोकळे होतील.

तलाव पूर्णपणे कोरडे करण्याच्या सूचना आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिल्या आहेत. समिती नेमके कुठे पाणी मुरते याचा शोध घेणार आहे. एकूणच धिम्यागतीने का होईना जलतरण तलावाच्या कामास मुहूर्त लागल्याने पुन्हा एकदा जलतरणपटूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासह संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या कामास सुरुवात झाली आहे.

तलाव पूर्ण कोरडे झाल्यानंतर तत्काळ आयआयटीच्या तज्ज्ञांना पाचारण केले जाईल. त्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुरूस्ती अथवा अन्य पर्यायांचा विचार केला जाईल.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर