शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे आजपासून खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:36 IST

कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे बुधवारपासून सर्व गणेश भक्तांकरीता पाहण्यासाठी खुले होणार आहेत.यात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात सजीव, तर उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरात तांत्रिक व आकर्षक मंदीरे साकारली आहेत. मंगळवारी उशिरापर्यंत मंडळांचे कार्यकर्ते या देखाव्यांवर सादरीकरणासाठी सज्ज ...

ठळक मुद्देतांत्रिक व आकर्षक मंदीरे साकारली सिंच्यान, अवकाश यान, दहीहंडी आदींवर तांत्रिक देखावे

कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे बुधवारपासून सर्व गणेश भक्तांकरीता पाहण्यासाठी खुले होणार आहेत.यात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात सजीव, तर उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरात तांत्रिक व आकर्षक मंदीरे साकारली आहेत. मंगळवारी उशिरापर्यंत मंडळांचे कार्यकर्ते या देखाव्यांवर सादरीकरणासाठी सज्ज होण्यासाठी अखेरचा हात फिरवत होते.

गणेशोत्सवात देखावे तेही उभेउभ प्रतिकृती आणि सद्यस्थितीवर आधारीत सजीव देखावे सादरीकरण करुन पुढील वर्षापर्यंत आपल्या मंडळाचे नाव गणेशभक्तांच्या तोंडी राहावे. त्यातून समाज प्रबोधन व्हावे, या उद्देशाने अनेक मंडळे रात्रीचा दिवस करुन या काळात राबतात. त्यात अनेक मंडळांच्या कार्यकर्ते तहान भुक हरवून आपला देखावा कसा चांगला होईल, याच्याच चिंतेत असतात.

अशा देखाव्यातून प्रबोधन करणे हा उद्देश या मंडळांचा असतो. यात कपिलतिर्थ येथील मित्र प्रेम तरुण मंडळ, शिवाजी पेठेतील जयशिवराय मित्र मंडळ (सर्किट फॅमिली) , सत्यप्रकाश सेवा मित्र मंडळ, रंकाळा टॉवर परिसरातील उमेश कांदेकर युवा मंच (गडकोट सद्यस्थितीवर भाष्य करणारा सजीव देखावा),, तर राजारामपुरीतील दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळ (काल्पनिक मंदीर) जयशिवराय मित्र मंडळ, शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदीर (पेट्रा जार्डन गुहा), शिवाजी उद्यमनगर येथील जयशिवराय मित्र मंडळाने ३० फुटी अवकाशयान व स्पेस सेंटर (तांत्रिक देखावा), मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने अ‍ॅड्राईड अ‍ॅपवर आधारीत ‘सिंच्यान’ , तर जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने साकारलेल्या ‘अपारंपारिक उर्जास्त्रोत ’ तांत्रिक देखाव्याद्वारे उर्जेचे महत्व पटवून दिले आहे.

तोरस्कर चौकातील सोल्जर गु्रपने लोप पावलेल्या आदिवासी संस्कृतीवर देखावा सादर केले आहे. शिपुगडे तालीम मंडळाने ‘स्त्री भू्रण हत्या’ तर हायकमांडो मंडळाने कोल्हापूरातील रखडलेल्या प्रकल्पांवर प्रकाशधझोत टाकणारा देखावा साकारला आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबने यंदा लग्नातील अपप्रवृती, प्रथा यांवर भाष्य करणारा सजीव व तांत्रिक यांचे मिश्रण असणारा देखावा साकारला आहे. यातील अनेक मंडळांचे काम अंतिम टप्प्यात, तर काही मंडळांचे देखावे सुरु करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर