शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

कोल्हापूर टोलप्रश्नी मंगळवारी चर्चा

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर टोलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबररस्त्यांच्या मूल्यांकनाबाबत मंगळवारी (दि. १७) चर्चा करू व या चर्चेतून निश्चितच मार्ग काढू आणि महिन्याअखेर कोल्हापूर टोलमुक्त करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) कोल्हापुरात दिले.कोल्हापूर टोलप्रश्नी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, निमंत्रक निवास साळोखे, आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत टोलचे पैसे कसे भागवायचे याविषयी चर्चा झाली. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीने यापूर्वी पुकारलेले सोमवार (दि. १६)चे शिरोली टोलनाक्यावरील आंदोलन होणार असल्याचे समितीने यावेळी स्पष्ट केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी, मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. मध्यंतरी माझी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर देशातील टोलप्रश्नाबाबत चर्चा झाली. या बंद केलेल्या टोलनाक्यांची रक्कम २३ हजार कोटी रुपये होते. त्यावर मी कोल्हापुरातील टोलप्रश्नासंदर्भात निर्णय घ्यावा, असे गडकरींना सांगितले. गडकरींनी यापूर्वी महाराष्ट्रातील बंद केलेल्या ६५ टोलनाक्यांची रक्कम सुमारे ९६२ कोटी रुपये होते व एलबीटी माफची रक्कम २७०० कोटी होते. ही सर्व रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भागविली जाण्याचे नियोजन असल्याचे मला सांगितले, असे बैठकीत पाटील यांनी सांगून कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी सुमारे १९२ कोटी रुपये रक्कम असल्याचा कोल्हापुरातील रस्त्यांचा मूल्यांकन अहवाल शासनाला सादर केला आहे. पण, आय. आर. बी. कंपनीने २७३ कोटी रुपये मूल्यांकन होते आहे, असे सांगितले आहे. यामध्ये सुमारे ८० कोटींचा फरक आहे, तो कसा भरून काढावा, यावर तुम्ही सूचना कराव्यात असे विचारले. त्यावर सर्वांनी राज्य सरकार, महापालिका यांनी आय. आर. बी. कंपनीने पैसे कसे भागवायचे ते तुम्ही ठरवावे, जनतेवर कोणताही आर्थिक बोजा लादू नये, असे सांगितले.त्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांनी, टेंबलाईवाडी येथील महापालिकेची जागा आय. आर. बी.ला दिली व आय. आर. बी.नेही जागा त्यांचीच उपकंपनी असलेल्या आर्यन हॉस्पिटॅलिटीला ९९ वर्षांच्या भाडेकराराने ती दिली आहे. त्यामुळे या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये असल्याचे आय.आर.बी. सांगत आहे.