शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

‘कोल्हापूर टोल’ आंदोलन राजकीय वळणावर

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

कार्यकर्त्यांत संभ्रम : निमंत्रकच भाजपच्या वाटेवर

कोल्हापूर : शहरात गेली साडेतीन वर्षे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे टोलविरोधी आंदोलन नेटाने सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘दक्षिण’मधून लढण्याची घोषणा केली. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच निवडणूक रिंगणात उतरून हव्या त्या पक्षाला निवडून आणून टोल हद्दपार करणे हा आंदोलनाचाच एक भाग असल्याचा खुलासा निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील टोलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा होती. मात्र, नवीन सरकारवर टोलचा प्रश्न सोपवून राज्यकर्त्यांनी मुद्द्याला बगल दिल्याची भावना कृती समितीच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत सलग आंदोलनचा एल्गार कृती समितीने पुकारला आहे. दरम्यान, यापूर्वीच ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेल्या कृती समितीचे निमंत्रक साळोखे यांनी आज, गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. कोणत्याही पक्षाचे लेबल नसल्यानेच निवास साळोखे यांची निमंत्रकपदी नेमणूक केली होती. आता आंदोलनास पक्षीय रंग येण्याची कुजबुज कार्यकर्त्यांतून व्यक्त होऊ लागली. याबाबत खुलासा करताना साळोखे म्हणाले, मला व्यक्तिस्वातंत्र आहे. कृती समितीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत. टोलविरोधात रस्त्यावरील आंदोलनास यश आले नाही. आता आगामी निवडणुकीत टोलबाबत फसविणाऱ्यांना धडा शिकविण्याची संधी आहे. शहरवासीयांना फसविणाऱ्यांना घरात बसविण्यासाठीच मी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. कृती समितीचा माझ्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. (प्रतिनिधी)