शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मुश्रीफ-संजय घाटगे भेटीचे तीन-चार अन्वयार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:24 IST

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त्यामागील कारणांचा अन्वयार्थ लावत आहेत.

ठळक मुद्देमुश्रीफ विरुध्द समरजित घाटगे अशीच विधानसभेची लढत निश्चित झाल्याचे वातावरण मुश्रीफ-संजय घाटगे भेटीचे तीन-चार अन्वयार्थ

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल हा तालुका गेली अनेक वर्षे केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे तिथे एखादी गोष्ट घडली तर त्याची चर्चा जिल्हाभर होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त्यामागील कारणांचा अन्वयार्थ लावत आहेत.

ढोबळ मानाने मुश्रीफ यांनी असे विधान करण्यामागे तीन-चार महत्वाची कारणे आहेत.ती अशी : १)कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून मुश्रीफ यांचा राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीस विरोध आहे. त्यामुळे त्यांना प्रा. संजय मंडलिक हे उमेदवार हवे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारावी असे मुश्रीफ यांना वाटते परंतू ही रिस्क घ्यायला मंडलिक तयार नाहीत. कारण पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाडिक यांच्या उमेदवारीस बळ देत असल्याचे चित्र आहे.भाजप- शिवसेनेची युती होण्याची शक्यता दाट आहे. अशा स्थितीत युतीची उमेदवारी मिळाली तर आपली बाजू बळकट होते असे मंडलिक यांना वाटते. कारण काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे मंडलिक यांना उघड पाठबळ देणार हे नक्की आहे. त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या पाठी नको म्हणून मंडलिक राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील मानसिक दबाव वाढविण्यासाठी मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.२)कागल विधानसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगे हे सध्या फारच आग्रही आहेत. ही उमेदवारी त्यांना मिळणार की संजय घाटगे यांना याबध्दल जोरदार रस्सीखेच आहे. उमदेवारीवरून मुळ घाटगे गटात सध्या अंतर्गत संघर्ष आहे. सद्यस्थितीत मुश्रीफ विरुध्द समरजित घाटगे अशीच विधानसभेची लढत निश्चित झाल्याचे वातावरण तयार झाले आहे. या स्पर्धेत आजच्या घडीला तरी संजय घाटगे यांचे नांव मागे आहे. ही लढत तशीच झाली तर विधानसभेला संजय घाटगे गटाची आपल्याला मदत व्हावी. ती नाही झाली तरी किमान टोकाचा विरोध तरी होवू नये या बेरजेच्या राजकारणांतून मुश्रीफ यांना संजयबाबा यांच्याबध्दल प्रेमाचा उमाळा आला आहे.३)समरजित घाटगे व संजय घाटगे या दोन नेत्यांमध्ये व दोन घाटगे गटातही विधानसभेच्या उमेदवारीवरून स्पर्धा आहे. समरजित यांनी मुश्रीफ हेच आपले राजकीय शत्रू असल्याचे जाहीर करून टाकून विरोधातला सगळा फोकस त्यांच्यावर केंद्रीत केला आहे. अशा स्थितीत मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्याबध्दल मवाळ भूमिका घेवून घाटगे गटातही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.४) मुश्रीफ लोकसभेची निवडणूक लढवण्याची फारच कमी शक्यता आहे. परंतू महाडिक यांना फारच विरोध झाला व पक्षाने त्यांना बदलायचा विचार केल्यास ही जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर येवू शकते. अशा स्थितीत कागल तालुक्यातून सगळेच गट विरोधात जावू नयेत, आपल्यासोबत कोणतरी असावे हा धोरणीपणांही या भेटीमागे असू शकतो.५) मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ समारंभासही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना निमंत्रित करण्यामागेही असेच कारण आहे. सध्या समरजित घाटगे यांचा सगळा प्रचार हा ‘शाहूंचा खरा वारसदार..व थेट रक्ताचा वारस..’याभोवती केंद्रीत झाला आहे. त्याला छेद द्यायचा म्हणून मुश्रीफ यांनी मुद्दाम कोल्हापूरच्या मूळ शाहू महाराजांनाच कारखान्याच्या कार्यक्रमाला निमंत्रित करून आपणही शाहू घराण्यावर प्रेम करणारेच असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे