शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्र, पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:03 IST

श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.

ठळक मुद्देश्री जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्रपहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.

पंचगंगा नदीघाटावर या अन्नछत्रालयाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या या अन्नछत्रालयात सुमारे एक लाखाहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेणार आहेत. यात मसालेभात, कुर्मापुरी, कांदा भजी, जिलेबी, शिरा, पापड, अशा पंचपक्वान्नांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रसादाचा लाभ सावलीत बसून घेण्याकरिता पंचगंगा नदीघाटावर पाच हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गणेश सावंत यांनी कॅटरिंग व्यवस्था यांनी केली आहे. याकरिता १०० सहकारी कार्यरत आहेत. पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला.

मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, महंमद पठाण, जगन्नाथ लिधडे यांच्या देखरेखेखाली अडीचशेहून कार्यकर्ते राबत आहेत. गेल्या वर्षी या अन्नछत्राचा लाभ सुमारे सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी घेतला.दरम्यान, सौराष्ट्र कडवा पटेल समाजातर्फे रोज या ठिकाणी चार हजारांहून अधिक भाविकांसाठी सकाळी ७ ते १० या वेळेत पोहे, शिरा, उप्पीट, चहा या नाष्ट्याची सोय केली आहे. त्याचाही लाभ अनेकांनी घेतला.

अन्नछत्राच्या उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, नीलेश पाटील, मनोहर चुघ, अतुल शहा, राजाभाऊ बेंडके, रमेश लालवाणी, मगनलाल ओसवाल, राजेंद्र आलूरकर, एस. के. पाटील, विजय शेटे, राजेंद्र शेटे, सतीश घोरपडे, के. के. खंडवाणी, अ‍ॅड. सुभाष हिंदुजा, गोपीशेठ वधवाणी, शशिकांत कोकाटे, सुरेश बेर्डे, जयसिंगराव कदम, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात दातृत्व असणारी माणसे भरपूर आहेत. त्यामुळे आमच्या मंडळाने गेली २४ वर्षे जोतिबा यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची भोजनाची सोय चांगल्या प्रकारे केली आहे. यापुढेही हे दातृत्व असेच चालू राहिले आहे. मंडळाचे गेली ३८ वर्षांतील सामाजिक व विधायक उपक्रम पाहून अन्नछत्रासाठी समाजातील अनेकांनी हातभार लावला आहे.- दत्तात्रय लाड, अध्यक्ष, अन्नछत्र

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर