शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

कोल्हापूर : त्यांचीही दिवाळी थाटामाटात, बालकल्याण संकुल; मुलांचा आनंद द्विगणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 12:36 IST

सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत आहेत.

ठळक मुद्दे... त्यांचीही दिवाळी थाटामाटात बालकल्याण संकुल; मुलांचा आनंद द्विगणित

कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत आहेत.मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये अनाथ, निराधार अशी सुमारे २३५ मुले-मुली आहेत. यांतील काहींना आपले आई-वडील, नातेवाइकांबाबत काहीच माहीत नाही. त्यामुळे घरची दिवाळी त्यांच्या नशिबातच नाही. या मुलांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बालकल्याण संकुल, दानशूर व्यक्ती व संस्थांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात येथे दिवाळी साजरी केली जात आहे.दीपावलीनिमित्त मुलांनी या परिसरात मातीचा किल्ला तयार केला आहे. त्यावर ठेवण्यासाठी सैनिकांच्या मातीच्या प्रतिकृतीही त्यांना कुणी भेट म्हणून दिल्या आहेत; तर काहींनी संकुलात आकाशदिवे लावणे, विद्युतमाळा लावणे, रांगोळी काढण्यासाठी पुढाकार घेऊन परिसर सजविल्याने दिवाळीचे वातावरण तयार झाले आहे. यामध्ये संकुलातील कर्मचारीही हिरिरीने सहभागी झाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.यासाठी बालकल्याण संकुलाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांच्यासह अधीक्षक व कर्मचारी मुलांच्या या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

 

सामाजिक दातृत्वातून संकुलातील मुले व मुलींना दरवर्षीप्रमाणे शिवाजी चौक तरुण मंडळ आणि काही दानशूर व्यक्तींनी नवीन कपडे भेट दिले आहेत. काही मुले दिवाळीनिमित्त सध्या नातेवाइकांकडे गेल्याने सध्या १५० मुले येथे वास्तव्यास आहेत.टी. एम. कदम, देणगी विभागप्रमुख, बालकल्याण संकुल

मुलांनीच तयार केला फराळबालकल्यास संकुलात दानशूर व्यक्तींकडून आलेला तयार फराळ न स्वीकारता, संकुलाच्या वतीने फराळासाठीचे साहित्यच स्वीकारले जात होते. स्वीकारलेल्या साहित्यातून संकुलातील आचारी व मुली स्वत:हून चकली, चिवडा, करंज्या, लाडू, आदी फराळ तयार करून त्याचा मनसोक्त आस्वादही घेत आहेत.

‘चेतना’ने दिली विशेष भेटचेतना विकास मंदिरमधील विशेष मुलांनी येथील कार्यशाळेत खास दीपावलीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील, उटणे, पणती अशा वस्तू तयार केल्या आहेत. यासह दिवाळीसाठी लहान आकाशकंदील, साबण, पणती, उटणे, सुगंधी द्रव्याची बाटली असा विशेष गिफ्ट बॉक्स या कार्यशाळेत तयार केल्याने, याला मोठी मागणी आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासह, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर