शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी पुलाकडे कोणी फिरकलेच नाही, रेंगाळलेल्या कामाचा प्रारंभ नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:44 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित सर्व कामांची एकत्रित ‘वर्क आॅर्डर’ निघाली असली तरी मंगळवारी काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही या पुलाच्या कामाकडे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी अथवा कृती समितीचे कोणीही फिरकलेच नाहीत.

ठळक मुद्दे शिवाजी पुलाकडे कोणी फिरकलेच नाही, रेंगाळलेल्या कामाचा प्रारंभ नाही  वादग्रस्त कामाबाबत अनेकजण संभ्रमावस्थेत

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित सर्व कामांची एकत्रित ‘वर्क आॅर्डर’ निघाली असली तरी मंगळवारी काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही या पुलाच्या कामाकडे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी अथवा कृती समितीचे कोणीही फिरकलेच नाहीत.

पश्चिमेकडून काम सुरू करावे व कोल्हापूरकडून काम करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी, अशी स्पष्ट अट ‘वर्क आॅर्डर’मध्ये समाविष्ट केल्याने कृती समितीचे सदस्य पुन्हा संभ्रमावस्थेत पडले आहेत.पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर पुरातत्त्व कायद्याच्या कचाट्यात उर्वरित काम २०१५ पासून अडकले आहे. या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

 सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचे धारदार शस्त्र उपसून प्रशासनाला जाब विचारल्यानंतर सोमवारी (दि. १४) सायंकाळी शिवाजी पुलाच्या उर्वरित कामाबाबत सुमारे ३ कोटी ५ लाख रुपयांची वर्क आॅर्डर काढून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना गोवा येथील आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्या.

हे काम पुलाच्या पश्चिमेकडून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, पूर्वेकडून (कोल्हापूर) पुलाचे काम करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याचेही वर्क आॅर्डरमध्ये नमूद आहे. त्यामुळे पर्यायी पुलाच्या वादग्रस्त असलेल्या बांधकामाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकाऱ्यांच्याच हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, पुलाच्या पश्चिम बाजूकडून या पुलाचे काम सुरू करावे, असे वर्क आॅर्डरमध्ये नमूद आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून या अर्धवट राहिलेल्या कामाच्या नावाखाली झालेल्या कामाचे ‘फिनिशिंग’ करण्यात येणार होते; पण मंगळवारी कामाचे ठेकेदार अथवा कृती समितीचे कार्यकर्ते कोणीही पुलाकडे फिरकलेच नाही.

पंधरा दिवसांत परवानगी शक्यपुलाच्या कामाची वर्क आॅर्डर सोमवारी दिली असली तरी पुरातत्त्व खात्याची अद्याप मंजुरी बाकी आहे. लोकसभेने मंजुरी दिली असली तरी राज्यसभेने पुरातत्त्व खात्याच्या परवानगीला हुलकावणी दिली.

त्यामुळे मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधि व न्याय खात्याच्या घेतलेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विधि व न्याय विभागाच्या अहवालानंतरच आपत्कालीन विभागाची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाची वर्क आॅर्डर दिली असली तरीही पुलाच्या बांधकामाबाबत किमान १५ दिवसांनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागcollectorतहसीलदार