शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गौरवाड ग्रामस्थांकडून ‘तिरडी मोर्चा’, आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:40 IST

कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक ‘तिरडी मोर्चा’ काढून ...

ठळक मुद्देगौरवाड ग्रामस्थांकडून ‘तिरडी मोर्चा’, आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन मागे२५ आॅगस्टला पालकमंत्र्यांसमवेत बैठकीचे आश्वासन

कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक ‘तिरडी मोर्चा’ काढून निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर शनिवारी ( दि. २५ आॅगस्ट) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.दुपारी दोनच्या सुमारास सर्व आंदोलक दसरा चौकात जमले. या ठिकाणी सरकारची प्रतीकात्मक तिरडी करण्यात आली. यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी घोषणाबाजी करीत ठिय्या मारण्यात आला. दरम्यान, आंदोलकांना चर्चेला पाचारण करण्यात आले.

यावेळी हातकणंगलेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे व शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव उपस्थित होते. त्यांनी हा प्रश्न धोरणात्मक असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

तसे पत्र  शुक्रवारी दिले जाणार आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.आंदोलनात सरपंच सलिम मुल्ला, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दिगंबर सकट, सुनील भोसले, रविकांत जगताप, संध्या मधाळे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर