शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

कोल्हापूरला लागतात दरमहा आठ लाख ‘डॉलर’

By admin | Updated: April 26, 2015 01:07 IST

मागणीत मोठी वाढ : परदेशात जाणाऱ्यांचा वाढता ओघ; पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही वाढली

विश्वास पाटील / कोल्हापूर कोल्हापुरातील लोकांचे पर्यटनासह विविध कामांच्या निमित्ताने विदेशी दौऱ्यावर जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने दरमहा आठ लाख डॉलर चलनाची खरेदी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात जसा डॉलरचा भाव वधारतो, तशी कोल्हापुरातील डॉलरची मागणीही दिवसें-दिवस वधारत असल्याचा अनुभव येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. साधारणत: २००० सालापर्यंतचे चित्र असे होते की परदेशात जाणे म्हणजे खूपच काही तरी मोठे केल्यासारखे मानले जाई. त्यावेळी दरमहा कसेबसे दहा-बारा लोक परदेशात जात असत. त्यातही उद्योजकांचीच संख्या जास्त होती. पर्यटनासाठी म्हणून विदेशात जाणे लोकांना फार चैन केल्यासारखे वाटे, परंतु आता स्थिती बरीच बदलली आहे. उद्योगधंद्यांशी संबंधित जेवढे लोक विदेशात जातात, त्याहून जास्त लोक पर्यटनाला जात आहेत. दुबई, थायलंड, सिंगापूरला जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. उद्योगधंद्यांशी संबंधित लोक मुख्यत: युरोप व चीनला जातात. त्या देशांमध्ये होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनांना भेटी देऊन नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची आस उद्योजकांमध्ये जास्त आहे. याशिवाय हल्ली खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर विदेशी सहलींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे. डॉक्टर, मेडिकल रिप्रेझिंटिव्ह यांच्यासाठी औषध कंपन्या असेच दौरे आखतात. त्यामुळेही विदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कोल्हापुरात बँक, प्रायव्हेट फॉरेन करन्सी एक्स्चेंज डिलर व ट्रॅव्हल्स एजन्सींकडे चलन विनिमय अधिकृत केंद्रे आहेत. ज्यांना फुल फ्लेज मनी चेंजर्स (एफएफएमसी) म्हटले जाते. कोल्हापुरात ट्रेंड विंग्ज, थॉमस अ‍ॅन्ड कुक, युएई एक्स्चेंज आणि रसिका ट्रॅव्हल्सकडे ही चलन विनिमयाची सोय उपलब्ध आहे. प्रतिदिन किमान ३० ते ३२ हजार डॉलरची विक्री या केंद्रातून होते. कोल्हापूरचा औद्योगिक विकास चांगला झाला असला तरी येथे अजून कॉर्पोरेट कंपन्या फारशा आलेल्या नाहीत. ‘किर्लोस्कर’, ‘मनुग्राफ’सारखे समूह आहेत परंतु त्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या न येण्यामागे रखडलेली विमानसेवा हे महत्त्वाचे कारण आहे,अन्यथा हा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची संधी होती. इस्रायलमधील शेती प्रदर्शनासाठी जाण्यास शेतकरी खूप इच्छुक असतात परंतु शेतीच्या मालकीची कागदपत्रे उपलब्ध न होणे, मालकी ज्यांच्याकडे आहे, त्यांचा पासपोर्ट काढलेला नसणे अशा अडचणी येत आहेत. कोल्हापुरात सध्या दहाहून जास्त देशांची करन्सी सहजपणे मिळू शकते. पूर्वकल्पना दिल्यास आणखी किमान पंधरा देशांची करन्सी उपलब्ध करून दिली जाते. या व्यवहारावरही थेट रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. दरमहा सात तारखेला या सगळ््या व्यवहारांची रिझर्व्ह बँकेकडून छाननी केली जाते. कोल्हापुरात दरमहा पाचशेहून अधिकजण पासपोर्ट काढून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.